जरांगे इशारा सभा | मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या संपूर्ण राज्यभर जोरदार गाजत असताना मनोज जरांगे पाटील यांना सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती. यातच उद्या सरकारने घेतलेली ही मुदत संपत असून त्यापूर्वी आज बीड शहरात मनोज जरांगे यांची निर्णायक इशारा सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक बीडमध्ये पोहोचले आहे. या इशारा सभेतून 24 डिसेंबरनंतर मराठा आंदोलनाची दिशा कशी असणार याबाबत मनोज जरांगे खुलासा करणार असून या सभेतकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
Breaking News | मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला होता. हा अल्टीमेटम उद्या संपणार आहे. तत्पूर्वी राज्यातील अनेक नेते हे जरांगे पाटील यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते मात्र मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचं दिसून आलं. दरम्यान आज जरांगे पाटील यांची इशारा सभा पार पडणार आहे. सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर 100 एकर परिसरात ही सभा होत असून या सभेतून जरांगे पाटील सरकारला नेमका काय इशारा देणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर अगदी थोड्याचवेळात म्हणजे दुपारी दोन वाजता या सभेला सुरुवात होणार असून मनोज जरांगे सभेकडे रवाना झालेले आहेत.
जरांगे इशारा सभा | बीड शहरात सुरक्षेची काळजी
आज बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा पार पडणार असून या सभेसाठी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक पोहोचले आहे. या इशारा सभेसाठी पाटील मैदान सज्ज करण्यात आलं असून या सभेमुळे संपुर्ण बीड शहर भगव्या पताक्याने सजवले आहे. तर बीड शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांची सजावट करण्यात आली तर सभेच्या ठिकाणी किल्ल्याची प्रतिकृती असलेले भव्य व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे. तसेच या सभेला येणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांसाठी 3 टन खिचडी आणि 4 लाख पाणी बॉटल नियोजित करण्यात आली आहे.
LPG Rate | सरकारने दिलेय महिलांना हे ‘न्यू इयर गिफ्ट’
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
आज बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा पार पडणार असून या सभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये कुठलाही तणाव नसून मनोज जरांगे पाटील यांची सभा शांततेत पार पडेल. त्यासाठी बीड पोलीसांचा रूट मार्च घेतला तर बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्यावरून बीड पोलिसांचे संपुर्ण सभेकडे लक्ष असेल. या सभेच्या पार्श्वभूमीवर दोन अपर पोलीस अधीक्षक आणि 55 अधिकारी तैनात करण्यात आलेत तसेच साधारणतः पोलीस आणि होमगार्ड असे 1800 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान बीडमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम