मनोज जरांगे पाटील पुन्हा करणार राज्याचा दौरा; जरांगेंचा मेगा प्लॅन आला समोर

0
18

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधलेला आहे. माझी प्रकृती चांगली आहे. मी ठणठणीत आहे. काळजी करु नका. डॉक्टरांनी मला ठणठणीत बरं केलेलं आहे. आता मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. आतापर्यंत मराठा समाजावर खूप अन्याय झालेला आहे. मात्र आता चांगले दिवस आलेले आहे. आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ येतो आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेले आहे.

मालेगाव | संजय राऊतांना पुन्हा जेलवारी ? काय आहे प्रकरण…वाचा सविस्तर

1 डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण करणार

मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील प्रत्येक गावात 1 डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. तसेच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. महाराष्ट्रातील दौरा कधीपासून सुरु होणार ते उद्या किंवा परवामध्ये जाहीर करणार आहे. या राज्याच्या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागात आपण जाणार असून मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहेत.

उद्रेक होईल असं आंदोलन करु नका

आपले आंदोलन शांततेचे तसेच लोकशाही मार्गाचे आहे. उद्रेक होईल असं काही करु नका. कोणीही आत्महत्या करु नका. 24 डिसेंबरपर्यंत आपणास खांद्याला खांदा लावून लढायचं आहे. न्याय मिळण्याचा दिवस जवळ आला आहे. न्याय मिळवण्यासाठी सातत्य ठेवावं लागणार आहे. आतापर्यंत आमच्यावर खूप अन्याय झालेला आहे. हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालेले नाही. आम्हाला शेतीही पाहायची आहे आणि मुलांसाठी काम करायचे आहे. आता मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.

देवळा तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी काँग्रेसचं आमरण उपोषण सुरू

सरकारचे शिष्टमंडळ घेणार भेट

सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी सोमवारी येणार आहे. राज्यात प्रथमच एकाच वेळी तीन समित्या काम करत आहेत. मागासवर्गीय आयोग, शिंदे समिती आणि न्यायमूर्तींची समिती काम करत आहे. यामुळे आता पूर्ण मराठा आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ आलेला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here