Manoj Jarange Patil | सगेसोयऱ्यांची मागणी मान्य करून ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) द्यावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाच दिवस असून, काल मंगळवारपासून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. यानंतर गावकऱ्यांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले.
मात्र, आज सकाळी बोलताना ते म्हणाले की,”जर लवकरात लवकर यावर तोडगा काढला नाही. तर आपण उपचारही घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्म असून, मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी के आहे. (Manoj Jarange Patil)
Manoj Jarange Patil | केसेस मागे घेण्याची प्रक्रिया सुरू
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत सरकार गंभीर आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्यांवरही राज्य सरकारकडून कारवाई केली जात आहे. मागील काळात आम्ही त्यांना केसेस मागे घेण्याचे जे आश्वासन दिले होते. ती प्रक्रिया सुरू असून, त्याबाबत सरकारने पहिले नोटिफिकेशनही जारी केले आहे आणि त्यावर कार्यवाही देखील सुरू आहे.
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाला आता अंतरवालीतील ग्रामस्थांचाच विरोध
भुजबळ यांना समजावणार
मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. मी ओबीसी नेत्यांशी चर्चा करत असून, मंत्री छगन भुजबळ यांच्याशी देखील मी चर्चा करून त्यांना समजावणार आहे. (Manoj Jarange Patil)
मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न
मराठा समाजातील ज्या व्यक्तींकडे कुणबी दाखला आहे. त्यांना सर्टिफिकेट देता येतं. सर्वोच्च न्यायालयाच्या जे निकषांत बसणारच नोटिफिकेशन काढले आहे. त्यामुळे ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. यावर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न असून मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं, असं आमचं मत आहे. (Manoj Jarange Patil)
यांना करायचं असतं तर, एवढा वेळ लागतो का..?
सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबाबत आता पाच महिने झाले. जर यांना करायचं असतं तर, एवढा वेळ थोडाच लागतो. आज संध्याकाळपर्यंत काय विषय आहे ते कळेल. आणि जर नाहीच कळालं तर हे सलाईन काढून टाकू. मंत्र्यावर विश्वास ठेवणं चूक आहे का..? असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. (Manoj Jarange Patil)
Manoj Jarange | विधानसभा निवडणूक लढवणार..?; मनोज जरांगेंची मोठी घोषणा..!
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम