Manoj Jarange : मराठा नेते मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कायम कार्यशील असतात. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आग्रही भूमिका घेताना दिसतात. सध्या विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे सर्वच नेते राज्याच्या विविध दौऱ्यांवर असल्याचे पाहायला मिळते आहे. मुख्य म्हणजे येत्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनोज जरांगे पाटील ही उतरणार असल्याची चर्चा आहे. याच संदर्भात मनोज जरांगे पाटील सुद्धा विविध ठिकाणी दौऱ्यांचे आयोजन करीत आहेत. याचवेळी त्यांनी मराठा आरक्षणावर बोलताना लाडकी बहीण योजनेवरून सरकार वरती टीकास्त्र सोडले. बीड जिल्ह्यातील तांदळा गावाला दौऱ्यावर असताना त्यांनी भेट दिली. तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे अशी भूमिका मांडली. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेवर भाष्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
Chhagan Bhujbal | लाडकी बहिण योजना अविरत सुरू राहील; मंत्री भुजबळांचा बहिणींना विश्वास
या सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. ती चांगली योजना आहे तेव्हा, तुम्ही सर्वांनी योजनेचे फॉर्म नक्की भरा कारण ते आपलेच पैसे आहेत. देवेंद्र फडणवीस स्वतःची जमीन विकून पैसे देत नाहीयेत. लाडक्या बहिणीला पैसे देऊन मदत केली पण भाच्याचं काय? त्याच्या आरक्षणाचा काय? असा सवाल करत फडणवीसांवर निशाणा साधला.
जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
” ज्यांनी आमची लेकरं जेलमध्ये घातली त्यांना मी सरळ करणार आहे. रेकॉर्ड शोधणे बंद आहे हे सर्व काही देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून होत आहे. भांडून भांडून मी सहा महिने मुदत वाढवून घेतली. ज्यांनी आम्हाला त्रास दिला आहे त्यांचा हिशोब चुकता करणार. लेकरांवर झालेला अन्याय विसरू नका एकाच दिवशी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करा. हे सर्व जनतेच्या हातात आहे. असं म्हणत मनोज जरांगे यांनी जनतेला आवाहन केले.
Ladke Daji Yojana | लाडक्या बहिणींना तगडे आव्हान; लाडक्या दाजींसाठी आली खास योजना
“देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे वातावरण कडू केलं आहे. मी मॅनेज होत नाही म्हणून माझ्या विरोधात डाव रचला जातो. हा देवेंद्र फडणवीस यांचा गनिमी कावा आहे. मराठा समाजाचा धसका घेऊन देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले. मात्र मी माझा डाव टाकला अन् 29 तारखेला होणारी बैठक पुढे ढकलली गेली. हैदराबाद येथे साडेतीन हजार कुणबी नोंदीचे दाखले सापडले असूनही देवेंद्र फडणवीस ते इकडे आणू देत नाहीयेत. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांवर अन्याय केला आहे.” असं म्हणत जरांगे फडणवीसांवर कडाडले. “आता आखाडा जवळ आला आहे. तेव्हा मी यांचा चांगलाच कार्यक्रम लावतो. सावध राहण्याची गरज आहे कारण यावेळेस सगळ्यांना पाणी पाजायचे आहे. येणाऱ्या काळात या सर्वांना यांची जागा दाखवून द्यायची आहे. येत्या निवडणुकीत यांना पाणी पाजायचा आहे. हे सरकार मराठा समाजाच्या मुळावर उठलंय तेव्हा यांना खुर्ची भेटू द्यायची नाही. असं म्हणत मनोज जरांगे यांनी येत्या निवडणुकीतील त्यांची भूमिका स्पष्ट केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम