Manoj Jarange | सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलंच पेटलेलं असताना मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी थोड्यावेळापूर्वी जालण्यातील आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी सरकारचं एक शिष्टमंडळ पाहोचलं असून यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.
Nashik news | सुट्ट्या पैशांची चिंता मिटली; आता ऑनलाइन तिकीट काढा
मराठा आरक्षणाचा पेच सोडविण्यासाठी सरकारने जरांगे यांच्याकडे 24 डिसेंबर पर्यंत मुदत मागितली होती मात्र ही मुदत संपण्यासाठी अवघ्या आठ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना सरकारकडून अपेक्षित उत्तर मिळत नसल्याचे म्हणत मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता आंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगेंची चर्चा सुरू असून यावेळी मनोज जरांगे पाटील यांना मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत भेटायला गेले आहेत. यावेळी मनोज जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न हे शिष्टमंडळ करत आहे. दरम्यान आई, पत्नी आणि मामा रक्ताच्या नात्यात येत नाही असं गिरीश महाजन यांनी मुद्दा मांडलेला असून यावेळी वाडिलांव्यतिरिक्त आत्या आणि मामालाही आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
Nashik Corona Alert | कोरोनाचं जोरदार पुनरागमन; आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर
तसेच नोंदी सापडल्या तरी पत्नीला आरक्षण नाही मिळणार असा दावा महाजनांनी केला आहे. यातच सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असून मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या सरसकट मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फार ठाम आसल्याचं दिसून येत आहे.
Manoj Jarange | सरकारच शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चेतील काही महत्वाचे मुद्दे–
रक्ताच्या नात्यांना आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी-
१. तुम्ही सरसकट शब्द लिहून दिला होता – मनोज जरांगे
२. आजोबा, काका, मुलांना सर्वांना प्रमाणपत्र दिले जाईल – गिरीश महाजन
३. सगेसोयरे म्हणजे कोण हे आधी तुम्ही स्पष्ट करा – मनोज जरांगे
४. सगेसोयरेचा अर्थ तुम्ही मामा, मामी असा गृहीत धरला – गिरीश महाजन
५. बायकोलाही देखील प्रमाणपत्र देता येणार नाही – गिरीश महाजन
६. सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? जरांगेचा सवाल
७. आई आणि पत्नी सगे सोयरे होऊच शकत नाही.- महाजन
यावेळी या चर्चेत आणखी एक मुद्दा समोर आलेला आहे. मागे आंदोलनाच्या वेळी सरकारकडून काही लिहून देण्यात आलं होतं. या सगळ्या गोष्टींवर जरांगे पाटील ठाम असल्याचं दिसून येत आहे. आता या चर्चेतून नेमकं काय सध्या होणार? मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम