Manoj Jarange | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र, काल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या मराठा आंदोलन विरोधी याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे यांना नोतिड बजावली आहे. दरम्यान, आता मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असलेल्या या उपोषणासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आता अवघ्या काही तासांतच मनोज जरांगे हे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल होणार होते. मात्र, आता त्याआधीच मुंबई पोलिसांनी या आंदोलनासाठी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी पत्राद्वारे याबाबत माहिती दिली आहे. (Manoj Jarange)
ही परवानगी नाकारण्यामागे आंदोलनासाठी राखीव असलेल्या मुंबईतील आझाद मैदानाची क्षमता कमी असल्याचे कारण पोलिसांनी दिले आहे. तर, या आंदोलनासाठी मनोज जरांगे यांनी मुंबई पोलिसांनी नवी मुंबई येथील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क हे मैदान सुचवले आहे. यावेळी जरांगे यांची आंदोलनाबाबतची परवानगी नाकारताना त्यांनी आझाद मैदान उपलब्ध नसल्याचं सांगत कारणेही दिली आहेत.
Manoj Jarange | मनोज जरांगेंना हायकोर्टाने बजावली नोटीस
Manoj Jarange | पोलिसांनी पत्रात दिलेली कारणे..?
१. ‘मुंबई’ ही भारताची आर्थिक राजधानी असून, मुंबई येथे अनेक वित्तीय संस्था तसेच आंतरराष्ट्रीय वकालती आहेत. मुंबईत दररोज ६० ते ६५ लाख नागरिक हे ट्रेन किंवा इतर वाहतूकीच्या माध्यमाने प्रवास करतात. दरम्यान, मराठा आंदोलक हे इतक्या मोठ्या संख्येने वाहनांसह मुंबईमध्ये आल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच यामुळे मुंबईची दैनंदिन वाहतुक व्यवस्थाही कोलमडण्याची शक्यता आहे.
२. मुंबईतील आझाद मैदानाचे ७००० स्क्वेअर मीटर हे क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवलेले असून, या मैदानाची क्षमता ही पाच ते सहा हजार आंदोलकांचीच आहे. मात्र, येथे इतक्या मोठ्या संख्येने जर आंदोलक आले तर त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा नाही. तसेच इतक्या सोयी सुविधाही येथे उपलब्ध नाही. तसेच उर्वरित इतर मैदान हे क्रीडा विभागाच्या अंतर्गत असून, तेथे आंदोलनासाठी परवानगी नाही.
३. लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक हे वाहनांसह मुंबईत येणार असल्यास मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. (Manoj Jarange)
Manoj Jarange | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनोज जरांगेंना आवाहन
४. यामुळे मुंबईतील एकूण सार्वजनिक व्यवस्थेवर या आंदोलनाचा मोठा परिणाम होईल. तसेच वेळोवेळी सांगितल्यानुसार हे आंदोलन प्रचंड संख्येचे असून, मुंबईमधील कोणत्याही मैदानामध्ये एवढ्या मोठया लोकसंख्येची क्षमता नाही. सदरचे आंदोलन हे अनिश्चितकालीन असल्यामुळे त्यासाठी आवश्यक सोयी दीर्घकाळासाठी मुंबईत पुरवणे शक्य नाही.
५. मुंबई उच्च न्यायालयाने आम्हाला आंदोलनासाठी योग्य जागा आपणांस सचविण्याबाबत निर्देश दिलेले असून, आपल्या या शांततामय मार्गाने आंदोलनासाठी ‘इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान, सेंटर पार्क जवळ, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई’ हेच मैदान योग्य राहील. तरी या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी.(Manoj Jarange)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम