Manoj Jarange | तिकडे आरक्षण एकमताने पास अन् इकडे जरांगेंनी सलाईन फेकली

0
20
Maratha Reservation
Maratha Reservation

Manoj Jarange | गेल्या चार महिन्यांपासून मराठा समाज करत असलेल्या आरक्षणासाठीच्या संघर्षाचा आज निकाल लागला. मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णयास मान्यता देण्यात आली आहे. हा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आयला आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील हे यावर नाराज आहे. अधिवेशनापूर्वी या अहवालाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. यानंतर आता विधिमंडळातही या मसुद्यास एकमताने बिनविरोध मंजूरी देण्यात आली आहे. (Manoj Jarange)

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “मराठा समाजाला देण्यात आलेले हे आरक्षण कोर्टात टिकणारे आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी एकमताने हे विधेयक संमत करावे, असे आवाहन केले होते. यानंतर या विधेयकावर कुठलीही चर्चा झाली नाही. सत्ताधारी नेते आणि विरोधक नेते एकत्र आले आणि त्यांनी आरक्षणाचे हे विधेयक विधानसभेत आणि त्यानंतर विधान परिषदेत मंजूर केले.(Manoj Jarange)

Maratha Reservation | ठरलं तर..! मराठा समाजाला इतके आरक्षण..?

तिसऱ्यांदा मंजूर झालेले आरक्षण टिकेल का..?

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय हा यावेळी तब्बल तिसऱ्यांदा सभागृहात आला असून, पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मराठा आरक्षणास विधिमंडळात मंजूरी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, न्यायालयात ते आरक्षण टिकले नाही. त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनीही दुसऱ्यांदा मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण दिले होते.

त्यावेळी हे आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केले. त्यावेळी फडणवीस यांनीही १३ टक्के आरक्षण दिले होते. दरम्यान, आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपडी असताना त्यांनी यावेळी तिसऱ्यांदा मराठा आरक्षणाला मंजूरी दिली आहे.आता एकनाथ शिंदे यांनी दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक मांडले आयहे आणि ते मंजूरी करून घेतले आहे. तसेच हे आरक्षण कोर्टात टिकेल असा दावाही त्यांनी केला आहे. पण आता हे कोर्टात टिकणार का? हे पहावे लागणार आहे. (Manoj Jarange)

Maratha Reservation | मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार..?; पण जरांगे ‘ओबीसी’वरच ठाम

Manoj Jarange | मनोज जरांगे का नाराज..?

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यास मंजूरी मिळाली आहे.मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सरकारवर नाराज आहेत. त्यांनी यानंतर पत्रकार परिषद घेतली असून, भर पत्रकार परिषदेत त्यांनी सलाईन काढून फेकली आहे आणि उपचार घेण्यासही नकार दिला आहे.(Manoj Jarange)

कारण त्यांना मराठा समाजास स्वतंत्र नाही तर ओबीसीमधूनच आरक्षण हवे आहे. त्यांची सगेसोयऱ्यांच्या मागणीची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी लाऊन धरली आहे.मात्र, ती मागणी मंजूर झालेली नाही. त्यामुळे इशारा दिल्याप्रमाणे मनोज जरांगे त्यांचे आंदोलन अधिक तीव्र करणार आहेत. ते उपोषण सुरू ठेवणार असून, उपोषणादरम्यान ते अन्न, पाणी आणि उपचार घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणात सत्ताधारी, विरोधक एकत्र आले. मात्र, मनोज जरांगे वेगळे पडले.(Manoj Jarange)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here