Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव; समाजाला भावनिक साद…

0
17
Manoj Jarange
Manoj Jarange

Manoj Jarange |  मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आधीपासूनच आग्रही राहिलेले आहेत. २६ जानेवारी रोजी देण्यात आलेल्या सगे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी आता पुन्हा गेल्या १० फेब्रुवारी पासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत. आज सकाळपासूनच त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. दरम्यान,”झोपेत सलाईन लावलं, मी मेलो तरी सरकारच्या दारात नेऊन टाका. मला सलाईन लावायचं असेल तर, आधी आरक्षणाची अंमलबजावणी कधी करता ते सांगा, अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी घेतली आहे. ते अंतरवाली सराटी येथील उपोषण करत असून, यावेळी ते बोलत होते. (Manoj Jarange)

Manoj Jarange | जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन 

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, “मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला धारेवर धरा. मी एकटा मुंबईत जाऊन बसेल. पण मी मेलो तर सरकारच्या दारात नेऊन टाका, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मंडळी आहे.

Manoj Jarange | देवळा येथे मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत

मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक 

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आता चौथ्या वेळेस उपोषणाला बसलेले आहेत. गेल्या १० फेब्रुवारी पासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधोपचार घेण्यास  नकार दिला आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असलेला एक फोटोही समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Manoj Jarange)

 मराठा क्रांती मोर्चातर्फे ‘महाराष्ट्र बंद’

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारले आहे. तर, या आंदोलनाला आळंदी, पुरंदर, बारामती, सोलापूर, मनमाड याठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.  तर, शहरी भागातही बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही भागात बंदला प्रतिसाद मिळालेला नाही.

Manoj Jarange | असा आहे मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा कसमादे दौरा

आमदाराच्या निवासस्थानासमोर उपोषण 

गेल्या १० फेब्रुवारी पासूनच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या या उपोषणाचा पाचवा दिवस असून, जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. यातच वैजापूर येथील आक्रमक आंदोलक हे त्यांच्या कुटुंबासह वैजापूर – गंगापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या निवासस्थानासमोर उपोषणासाठी बसले आहेत. अजय साळुंके असे या उपोषणकर्त्याचे नाव आहे.(Manoj Jarange)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here