Mamta Banerjee | निवडणुकांच्या आधीच विरोधकांचा गट फुटला..?

0
21
Mamta Banerjee
Mamta Banerjee

Mamta Banerjee | देशाच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. विरोधकांच्या काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला खिंडार पडले आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या गटातून एक मोठा पक्ष बाहेर पडला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष तृणमुल काँग्रेस यांनी इंडिया आघाडीला दूर करत. पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इंडिया आघाडीत खडाजंगी सुरू होती. तसेच ममता बॅनर्जी यादेखील नाराज असल्याचे दिसत होते. अल्हेर त्यांनी आज हा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसने तृणमुल काँग्रेसचा प्रस्ताव मान्य न केल्याने हा निर्णय घेतल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. तृणमुल काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू होती. दोन्ही पक्षांमध्ये वाद झाल्याने ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. नुकतीच लोकसभा निवडणुकीची संभाव्य तारीख जाहीर झाली अन् लगेच इंडिया आघाडीची पहिली विकेट पडली. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण ४२ जागा असून, येथे ममता बॅनर्जी यांची साथ सुटणे याचा मोठा फटका कॉंग्रेसला बसणार आहे. दरम्यान, अजून पुढे देशाच्या तसेच राज्यच्या राजकारणातही आणखी काय काय होणार हे पाहणे अधिक औत्सुक्याचे ठरणार आहे. (Mamta Banerjee)

Loksabha 2024 | लोकसभेचा बिगुल वाजला; संभाव्य तारखा जाहीर..!

Mamta Banerjee | काय म्हणाल्या ममता बॅनर्जी..?

यावेळी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्षासोबत माझी कुठलीही चर्चा झालेली नसल्याचे सांगितले. यावेळी त्या म्हणाल्या की,“पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्यानेच निवडणूक लढवणार असल्याचे आम्ही आधीपासूनच सांगत आलो आहे. तृणमुल काँग्रेस ही एक धर्मनिरपेक्ष पार्टी आहे. आम्ही आमच्या स्वबळावरच भाजपला हरवू शकतो. मी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘न्याय यात्रा’ ही आमच्या राज्यातूनच जाणार आहे. पण त्याबद्दल आम्हाला काहीही सांगण्यात आलेले नाही” असंही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.(Mamta Banerjee)

Uddhav Thackrey | आता रामाच्या नावाने मतं मागताय नंतर देशाला काय देणार घंटा; ठाकरेंची तोफ कडाडली

नेमकं काय बिनसलं..?

लोकसभा जागा वाटपावरुन काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसमध्ये एकमत झालं नाही. काँग्रेसने १० ते १२ जागांची मागणी केली होती आणि तृणमुल काँग्रेस केवळ दोन जागा देत होती. त्यामुळे काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पेटली आणि चर्चा इथे फिस्कटली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये बहरामपूर व मालदा दक्षिण या दोनच जागा जिंकल्या होत्या. या दोन जागांचीही आता तृणमुल काँग्रेसकडून मागणी केली जात होती. मात्र, काँग्रेस यासाठी तयार नव्हती. यामुळे आता ममता बॅनर्जी या आगामी लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. (Mamta Banerjee)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here