Malegaon News | नाशिक मर्चंट बॅंक गैरव्यवहार प्रकरणी मालेगावात ईडीडून छापेमारी

0
6
#image_title

Malegaon News | भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेतून 125 कोटी रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याप्रकरणी ‘व्होट जिहाद’चा आरोप केला होता. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. दरम्यान, गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून संगमेश्वर भागात हवाला व्यापाऱ्याच्या घरी छापेमारी करण्यात आली यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Malegaon News | मालेगावात सराईतांना धडकी; 320 जणांनी दिले चांगल्या वर्तवणुकीच्या हमीचे बॉण्ड

नेमके प्रकरण काय?

मालेगाव तालुक्यातील बारा तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत, नाशिक मर्चंट बँकेत त्यांच्या नावे खाती उघडून या खात्यातून सुमारे सव्वाशे कोटींचे आर्थिक व्यवहार झाल्याचा प्रकार शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत उघड केला होता. फसवणूक झालेल्या तरुणांनी दिलेल्या तक्रारीनुसार छावणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर बँकेकडून सदर खाती गोठवण्यात आली. तर पोलिसांकडूनही बँकेसह संबंधित घटकांची चौकशी सुरू होती.

Malegaon | मालेगावात गोरगरीब तरुणांच्या खात्यांवरून शेकडो कोटींचे व्यवहार; नेमकं प्रकरण काय..?

किरीट सोमयांकडून सीबीआय चौकशीची मागणी

यादरम्यान, किरीट सोमय्या यांनी बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी मालेगावला भेट दिली. यावेळी त्यांनी ‘ईडी’सह, सीबीआय या तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी करावी. अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी ईडीच्या पथकाकडून संगमेश्वर भागातील आनंदनगर येथील रहिवासी असलेल्या एका हवाला व्यापाऱ्याच्या घरी सकाळी दहाच्या सुमारास छापा टाकण्यात आला. संध्याकाळी उशिरापर्यंत पथकाकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान या व्यापाऱ्यास छावणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या चौकशीत काय निष्पन्न झाले, हे अद्याप समोर आले नसून या प्रकाराची शहरासह तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. चौकशीत काय निष्पन्न होते. याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here