Malegaon | राज्यामध्ये आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली आहे. असे असूनही नाशिकच्या मर्चंट बँकेच्या शाखेत गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये जवळजवळ शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून झाल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित तरुणांच्या नावावर बनावट कंपन्या तयार करून कुणाच्या नावावर 10 तर कुणाच्या नावावर ती 15 कोटी अशा रकमेपर्यंत व्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित तरुणांना मालेगआव मार्केट कमिटीत नोकरीचे आमिष दाखवत सिराज अहमद या इसमाने तरुणांच्या आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सह्या घेत नाशिक मर्चंट बॅंबॅंके (मालेगाव शाखा) बनावट खाती उघडली व त्या खात्यावरून आचारसंहिता लागू झाल्यानंतर गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये शेकडो कोटींचे आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.
Malegaon | मालेगावात सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे ‘भिक मागो’ आंदोलन
दोषींवरती कठोर कारवाईची मागणी
हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर सदर तरुणांनी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे धाव घेतली असून न्यायाची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज दोशींवरती कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी असलेले निवेदन पोलीस अधीक्षकांकडे देण्यात आले आहे. पोलिसांकडून सदर घटनेची दखल घेतली गेली असून हा व्यवहार कोणी केला? यामागे कोणाचा हात आहे? याबाबत चौकशी सूरू असून अद्याप कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम