मालेगाव : येथील मनपामध्ये किमान वेतनावर स्थानिक १५०० कर्मचारी भरती करून कचरा संकलन ठेका रद्द करण्यात यावा या मागणीकरीता ‘आम्ही मालेगावकर’ विधायक संघर्ष समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. मनपा उपायुक्त शिंदे यांना निवेदन देण्यात आले. सीटू संघटनेचे कामगार नेते रमेश जगताप यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या. सद्यस्थितीत कर्माचाऱ्यांना मात्र ८००० रुपये वेतन मिळत असून कपात करुन फक्त ४,५०० रुपये हातात येत असून तेवढ्यात उपजीविका कशी भागवणार..? त्यांना किमान वेतनावर मनपामध्ये भरती करून घेण्याच्या ह्या आंदोलनात सीटू संघटना पूर्ण ताकतीने आम्ही मालेगावकर समितीसोबत खांद्याला खांदा लावून उभी राहिल अशी ग्वाही यावेळी दिली.
तसेच आनंद आव्हाड यांनी खाजगी विज कंपनी व मानपातील खाजगी ठेक्यांमुळे संविधानाने दिलेला अधिकाराचा भंग होत असून हे खजागीकरण बंद करावे, गुलामगिरी बंद करावी यासाठी सर्वांनी पेटून उठावे असे आवाहनही करण्यात आले. हिंदू मुस्लिम एकता संघटना व मोमीन कॉन्फरन्सचे अध्यक्ष जमील क्रांती यांनी मालेगाव शहरातील सर्व सामाजिक संघटना कामगारांच्या हितासाठी काम करतील. खांद्याला खांदा लावून लढा उभारतील. फक्त कामगारांनी या अन्यायाविरोधात एकजुटीने लढले पाहिजे असे आवाहन केले. तर, कैलास तिसगे यांनी लोकप्रिय पालकमंत्र्यांनी या कामगारांना किमान वेतनावर महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी आदेश द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
कचरा कुंडी घोटाळा, बेंच खरेदी घोटाळा काढणे, आंदोलन करुन जिजामाता उद्यान, शिवतीर्थ सुशोभीकरण, गणेश कुंड येथील पादचारी पुल, सिनेमैक्स रोड, सोमवार बाजार व्यापारी संकुल आदी विषयावर आंदोलन करुन ते विषय तडिस नेले म्हणून समाजकंटक ही उपमा आम्हास मिळत असेल. तर आम्ही ती उपमा स्वीकारायला तयार असल्याचे उत्तर देवा पाटील यांनी यावेळी दिले.
९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधुन मालेगाव शहरातील भूमिपुत्र कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी नव्या क्रांतीला सुरुवात करत आहोत. हे आंदोलन कर्मचारयांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत चालूच ठेवू. जनतेत जावून खाजगी वीज वितरण कंपनी, कचरा संकलन ठेका किंवा मनपामधील विविध भ्रष्टाचाराचे विषय असतील याबत जनजागृती करु, असे निखिल पवार यांनी सांगितले. इतक्यावरच न थांबता पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर सरळ सरळ आरोप करत ते म्हटले की, “भ्रष्टाचारी ठेकेदाराला पाठबळ देत असून कामगारांना न्याय मिळवून देण्यात पालकमंत्री स्वारस्य दाखवत नाही अन्यथा आज आंदोलनाची वेळच आली नसती.
मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे सामाजिक कार्यकर्ते सुनील वडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण
समाज हिताचे प्रश्न उचलत असताना माझ्यावर किती आरोप करा. हल्ले करा तरी मी कोणत्याही दबावाला बळी न पडता शहराच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील. माझी जडण घडण ही माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक भिकन जिभाऊंच्या तालमीत झाली असून त्यांच्याकडून मिळालेले बाळकडू मला कोणालाही घाबरण्याची अनुमती देत नसून माझ्या संघटना व मित्रपरिवार फोडण्याचा प्रयत्न, घरावर हल्ला झाला तरी मी नडगमगता लढत आहे. पण स्वतःला राजकीय व्यवस्थेतील विरोधक म्हणून घेणाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या विषयावर व जनतेच्या प्रश्नावर शांत बसून या लढाईतून काढता पाय घेतला आहे. जरी आम्हाला कोणाची साथ मिळाली नाही. तरी मी प्रामाणिक व सच्च्या कार्यकर्त्यांच्या जीवावर शेवटपर्यंत भ्रष्टाचार व अन्यायाविरुद्ध लढत राहणार” असल्याचे निखिल पवार म्हणाले.
यावेळी कामगारांच्या व्यथा मांडताना ते भावनिक झाले होते. आंदोलनात निखिल पवार, रमेश जगताप, देवा पाटील भरत पाटील जमील क्रांती, सुशांत कुलकर्णी, कैलास तिसगे, आनंद आव्हाड, अझर खान, राजेंद्र पाटील, मोहन कांबळे, दीपक अहिरे, राकेश शिंदे, आनंद निकम, संकेत खरात, सागर निकम, प्रदीप पवार, संतोष शिंदे, सिद्धार्थ मगरे, सुशील उशिरे, मिलिन आहिरे, विशाल जाधव, बापू निकम, मनोज वाघ, तात्या खरे, आनंद जोगदडे, एकनाथ शिंदे, अरविंद महाले, रुपेश बालीद, अनिल पाटील, रोशन गांगुर्डे, व शेकडो महिला पुरुष आंदोलनात सहभागी झाले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम