Malegaon : बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने यंदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला आहे. अजूनही जवान चित्रपट हा चित्रपटगृहात सुरु आहे. नाशिक मधील मालेगाव शहरात किंग खानचा मोठा चाहता वर्ग आहे. यातच काल संध्याकाळी जवानचा शो सुरु असताना अचानक काही शाहरुख चाहत्यांनी चक्क चित्रपटगृहात फटाक्यांची आतिषबाजी केली. या सर्व प्रकारा नंतर पोलिसांनी चाहत्यांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केलेले आले आहेत.(Malegaon)
Breaking | एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या; तिला संपवुन तरुणाची गळफास घेत आत्महत्या
शाहरुख खानच्या चाहत्यांची हुल्ल्हडबाजी
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केलेली आहे. नाशिकमधील मालेगाव शहरात शाहरुख खानचा प्रचंड चाहता वर्ग आहे. दरम्यान शहरातील कमलदीप चित्रपटगृहात शाहरुख खान ‘जवान’ चित्रपट सुरु असतांना त्याच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात फटाके फोडल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. फटाके फोडण्याचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झालेला आहे. त्यामुळे अचानक झालेल्या फटाक्यांच्या अतिषबाजीमुळे इतर प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. त्यामुळे मध्येच चित्रपट बंद देखील करावा लागला. फटाके फोडणाऱ्या चाहत्यांचा हा अतिउत्साह बाकीच्या प्रेक्षकांच्या जीवावर देखील बेतु शकला असता. त्यामुळे या हुल्ल्डबाजांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे.
Pune News | पुण्यातील माजी नगरसेविकेला धमकावून मित्राने केला अत्याचार
मालेगावात ‘हा’ प्रकार काही नवीन नाही
या दरम्यान, बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानच्या चित्रपटाचं अवघ्या जगाला वेड लागलेलं असत. ‘जवान’ चित्रपटाने भरगोस कमाई केलेली असून अजूनही हा चित्रपट सिनेमागृहात हाऊसफुल सुरु आहे. विशेष म्हणजे मालेगावात शाहरुख खानची प्रचंड क्रेझ पहायला मिळते. जेव्हा जेव्हा शाहरुख खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर येतो तेव्हा मालेगावच्या चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होताना दिसते. तसेच फटाके फोडण्याची परंपरा गेल्या 30 वर्षांपासून पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. एकीकडे सार्वजनिक ठिकाणी आणि सिनेमागृहात चित्रपटगृहात ज्वलनशील पदार्थ नेण्यास बंदी असताना देखील या प्रकारे क्रेझी फॅन्सकडून सर्रास फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येतेय. कालही अशाच प्रकारे शो सुरू असताना मालेगावात सुतळी बॉम्ब फोडण्यात आले होते. चित्रपटगृह प्रेक्षकांनी भरगच्च भरलेलं असताना हा प्रकार घडल्याने सर्व नागरिक संताप व्यक्त करत होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम