Makar Sankranti | देवळा येथे दाजी पाटील पतसंस्थेच्या वतीने सभासदांना भेटवस्तू वाटप 

0
13

Makar Sankranti |सोमनाथ जगताप – देवळा | देवळा येथील दाजी पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आज सोमवारी मकरसंक्रांत दिनाचे औचित्य साधून पतसंस्थेच्या सभासदांना भेटवस्तुचे वाटप करण्यात आले आहे.

Milind Deora | १० – १५ दिवसांत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप..?

Makar Sankranti | सभासदांना आकर्षक भेट वस्तूचे वाटप

या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना 6 टक्के डिव्हिडंड आणि भेटवस्तु देण्याचे ठरविले होते. यानुसार संस्थेच्या वतीने सर्व सभासदांना आकर्षक भेट वस्तूचे वाटप चेअरमन अशोक संतोष आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. या निर्णयाचे सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.

Crime News | पत्नीने पाचवं लग्न केलं अन् चौथ्या पतीने पेट्रोल टाकून पेटवले

यावेळी व्हा.चेअरमन श्रीमती लता आहेर, संचालक सर्वश्री डॉ. विजय आहेर, कौतिकराव भामरे, राकेश आहेर, किरण आहेर, शिवाजी जाधव, बाळासाहेब आहेर, मनोज आहेर, प्रवीण चंदन, अनिता पवार आदींसह व्यवस्थापक दत्तात्रेय आहेर, भूषण कापडणीस, अरबाज शेख, अरविंद आहेर, सुनील गांगुर्डे उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here