Maharashtra Rain | परतीच्या पावसामुळं देशातील काही राज्यांना बसणार फटका

0
71

Maharashtra Rain : यंदाच्या वर्षी पावसानं सुरुवातीच्या दिवसांमध्ये अनेकांनाच चकवा दिलेला आहे. जुलै आणि ऑगस्टचे काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसानं महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यातच चांगलाच जोर धरला. ज्यानंतर हा पाऊस आता ऑक्टोबरही गाजवतो का, हाच प्रश्न अनेकांना पडला आहे. किंवा हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसानं तशीच हजेरीही लावली. परंतु, आता मात्र मुंबई, ठाणे आणि पालघर पट्ट्यातून पाऊस काहीसा कमी होताना दिसतोय. तर, तळकोकणातही तो तुरळक प्रमाणात होताना दिसत आहे. (Maharashtra Rain)

थोडक्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांतून पावसाचं प्रमाण कमी झालं असलं तरीही परतीच्या वाटेवर निघालेला हा मोसमी पाऊस जातानासुद्धा धुमाकूळ घालताना दिसणार आहे. सध्या देशाच्या अनेक भागांमध्ये पावसामुळे या बदलतं हवामान पाहायला मिळत आहे. मुंबईत दुपारच्या वेळी तापमानाचा आकडा चांगलाच वर जाताना दिसत आहे तर, तिथं कोकणातही दमट हवामानाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे.

IND vs AUS | शुभमन गिलला डेंग्यु, मग रोहित शर्मासोबत कोण येणार ओपनिंगला?

मराठवाडा आणि विदर्भासह सोलापूर पट्ट्यामध्ये मात्र पावसाच्या सरी तारांबळ उडवताना दिसत आहेत. तिथे कोल्हापूर आणि साताऱ्यात घाटमाथ्यावर काळ्या ढगांची दाटी होत असून, मधूनच पावसाची जोरदार सर बरसत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर निर्माण होणारे चक्राकार वारे आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळं हे बदल होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Mumbai | गोरेगावात इमारतीला भीषण आग; 3 मुलांसह सात जणांचा मृत्यू

देशभरातील हवामानाचा काय अंदाज?

खासगी हवामान संस्था स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या 24 तासांमध्ये पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि आरसाममध्ये पावसाची जोरदार हजेरी असणार आहे. तर, राजस्थान, मध्य प्रदेशातून मात्र पाऊस दूर जाणार आहेत. तिथे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल तर, काही ठिकाणांवर पावसाची एखादी सर अचानकच हजेरी लावताना दिसणार आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय भागांमध्ये सध्या तापमान कमी होताना दिसत असून, थंडीची लाट देशाच्या दिशेनं येताना दिसत आहे. ज्यामुळे अतीव उंचावर असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये हिमवृष्टीही होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here