Maharashtra Politics | लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रातील महायुती आणि विशेषतः भाजप नेत्यांना मोठा धक्का बसला असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक विधान केले होते. तर, फडणवीस यांनी थेट आपल्याला उपमुख्यमंत्री पदावरून पदमुक्त करण्याची विनंती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली. या पार्श्वभूमीवर काल त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेटही घेतली. दरम्यान, यातच आता दिल्लीतून मोठी बातमी समोर येत असून, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय फेरबदल होण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि आरएसएस हे महाराष्ट्रात मोठा राजकीय सर्जिकल स्ट्राइक घडवण्याची शक्यता आहे. तर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वाला मान्य नसला तरी काल अमित शाह यांची भेट घेत फडणवीस यांनी त्यांना आपली बाजू पटवून दिल्याचे दिसते. त्यामुळे आता लवकरच राज्य नेतृत्वात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून, फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यास उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
Devendra Fadnavis | फडणवीसांना केंद्रात मंत्रीपद..?; राज्यात भाजपा नेतृत्वात फेरबदल होण्याची शक्यता
यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा भाजपसाठी फायद्याचा..?
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यामुळे मराठा समाजाचा त्यांच्यावरील रोष कमी होण्यास मदत होईल. तसेच फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपची आणि फडणवीस यांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासही मदत होईल. राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्ह्यांमुळे विरोधी पक्षाकडून वारंवार फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. जसे की, पुणे अपघात प्रकरणी गैरव्यवहाराचे राज्यभर पेटलेले प्रकरण. तसेच फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील खराब प्रदर्शनाची जबाबदारी घेतल्यास त्यांची, भाजप आणि महायुतीचीही प्रतिमा सुधारण्यास मदत होईल, असे भाजपच्या एका वर्गाला वाटते.
कारण विक्रमी फरकाने पराभूत होऊनही सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली नाही. किंवा भाजपचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (vikhe patil) यांचा मुलगाही निवडणूक पराभूत झाला. अहमदनगर जिल्ह्यात प्रशासनावर कडक पकड असतानाही या जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुतीने गमावल्या. जालना जिल्ह्यातही केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांचा मोठ्या फरकाने दारुण पराभव आणि बीडयामध्ये जी निवडणूक एकतर्फी आणि पांकजा मुंडे यांच्या बाजूने कललेली वाटत होती. तिथेही पांकजा मुंडे यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. त्यामुळे एकूणच पराभव मान्य करत राज्यातील एकूण वातावरण पाहता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रात भाजपसाठी पोषक वातावरण निर्मिती होईल.
Maharashtra Politics | ‘भाजपचे संकटमोचक’ होणार उपमुख्यमंत्री..?
तर, देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामयानंतर त्यांच्याजागी भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी नेते गिरीश महाजन यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. याचे कारण म्हणजे, ते भाजपचे गेल्या ६ टर्मपासूनचे सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. तर, अलीकडच्या काळात त्यांची “भाजपचे संकटमोचक” (Girish Mahajan) अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. जळगाव या त्यांच्या होम ग्राउंडवर दोन्ही जागा भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मोठ्या फरकाने जिंकल्या असून, गिरीश महाजन यांचा नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील काही भागांवरही चांगला प्रभाव आहे. तसेच ते आरएसएसचे दीर्घकाळ सदस्य असून, देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील असल्याने महाजन यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम