Maharashtra News | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतचं मोठं विधान केलेलं आहे.मा. एकनाथ शिंदे हेच सध्या मुख्यमंत्री राहतील. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर त्यांना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री करू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे.त्याला आता राष्ट्रवादीचे नेते दुजोरा देत असताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्रम यांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा अर्थच उलगडवून सांगितलेला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे.(Maharashtra News)
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम हे मीडियाशी संवाद साधत होते. पाच वर्षाकरता होईल की आणखी काय होईल हे माहीत नाही. पण अजितदादा मुख्यमंत्री होणार. लवकरच ते मुख्यमंत्री होतील, असा दावा धर्मरावबाबा अत्राम यांनी केलेला आहे. अजितदादा पुढच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होणार आहे काय? असा सवाल त्यांना करण्यात आला होता. त्यावर तसं काही नाही. ते केव्हाही मुख्यमंत्री होतील. राजकारण काही सांगून येत नाही. राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही, असं सूचक विधान धर्मरावबाबा यांनी केलं.यापूर्वी आमच्याकडे औषध खरेदीचे अधिकार होते. यानंतर हाफकीन आणि नंतर प्राधिकरण तयार झालं. औषधांची कमतरता आहे असं काही घडलं नाही. डॉक्टरांची कमतरता जाणवली. पाच दिवस सुट्ट्या असल्यामुळे खासगी रुग्णालय बंद होते.यामुळे रुग्ण वाढले, असं धर्मरावबाबा अत्राम यांनी सांगितलं.
Gas Price: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅस सिलेंडरचे दर पुन्हा घसरले
जास्तीत जास्त जागा निवडून आणणार असा दावा
अजितदादा मुख्यमंत्री बनू शकतात हाच देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा अर्थ आहे. पुढच्या निवडणुकीनंतर किंवा त्यापूर्वीही अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात. दादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील, असंही त्यांनी सांगितलं.
गोंदियामध्ये पक्ष वाढवणार
गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीआहे. हे आधीपासूनच ठरलं होतं. खासदार प्रफुल्ल पटेल यांचा हा जिल्हा आहे. त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. पालकमंत्री म्हणून काम करताना गोंदिया जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यावर आणि राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यावर आमचा भर असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Election | ग्रामपंचायत निवडणुकीचा उडणार धुरळा, मतदानाची तारीख जाहीर
दोन्ही दादा नाराज नाही
तसेच पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून अजितदादा यांच्या नाराजीचा प्रश्नच नव्हता. पुण्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला द्यायचं हे आधीच ठरलं होतं. फक्त ते देण्यासाठी थोडा उशीर झाला आहे. तर पुण्याचं पालकमंत्रीपद गेल्याने चंद्रकांतदादा पाटील नाराज नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भेसळखोरांना चाप देणार
दिवाळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोरांवर आळा बसवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग संपूर्ण राज्यात धाडसत्र राबवणार आहे. भेसळ थांबवण्यावर आमचा भर राहील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच नागपूरातील सडक्या सुपारीच्या उत्पादनावर एक मोठी कारवाई आमच्या विभागाने केली आहे. आणखी कारवाई करण्यात येणार आहे. आम्ही आतापर्यंत सव्वादोन कोटीची सुपारी जप्त केलीय, असं धर्मरावबाबा अत्राम यांनी सांगितलं.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम