उद्याचा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला, जाणून घ्या कारण ?

0
17

मुंबई : राज्यात दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळ सत्तेत असल्याने मोठ्या प्रमाणात टीकास्त्र होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दरम्यान, उद्या म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी होणारा मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तारही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून गुरुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पक्षाच्या बड्या नेत्यांची भेट घेतली.

आम्हालाच खरी शिवसेना मानून पक्षाच्या चिन्हाचा अधिकारही मिळावा, अशी याचिका एकनाथ शिंदे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेबाबत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत की, एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर कोणताही निर्णय घेऊ नये. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रमना, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सांगितले की, महाराष्ट्रातील अलीकडील राजकीय संकटाशी संबंधित प्रकरणे घटनापीठाकडे पाठविण्याबाबत सोमवारपर्यंत निर्णय घेण्यात येईल. याशिवाय या याचिकेबाबत खंडपीठाने सांगितले की, हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे पाठवायचे की नाही याबाबत आम्ही निर्णय घेऊ.

शिंदे-फडणवीस यांचा ३० जून रोजी शपथविधी झाला.

30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून मंत्रिमंडळाचा विस्तार लटकला आहे. यावरून विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही अनेकदा शिंदे आणि फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here