Maharashtra Election: बहुप्रतिक्षित करोनामुळे आणि महाराष्ट्रातील सततच्या राजकीय संघर्ष आणि सत्तानाट्य यामुळे रखडलेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या महाराष्ट्रातील महानगर पालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पेच अखेर सुटला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदार याद्यांसंदर्भात काढलेल्या अधिसूचनेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता या निवडणुका येत्या तीन महिन्यांत पार पडणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
chacha bhatija: सत्तेच्या लढाईत काका – पुतण्या संघर्षात भारतात या जोड्या ठरल्या वादग्रस्त
राज्य निवडणूक आयोगाने ५ जुलै रोजी एक परिपत्रक जारी केलं आहे. ज्यामध्ये राज्य विधानसभेच्या मतदार याद्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. “दिनांक १ जुलै २०२३ रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या महानगर पालविका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील असे अधिसूचित करण्यात येत आहे”, असं या अधिसूचनेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने उल्लेख केलेला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम