Maharashtra HSC 12 Results | राज्यात बारावीचा निकाल ९३.३७ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

0
14
Maharashtra SSC 10th Result
Maharashtra SSC 10th Result

Maharashtra HSC 12 Results |  अखेर बहुप्रतीक्षित अशा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (Maharashtra HSC Results 2023 Declared) इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल (12th Results) जाहीर करण्यात आला आहे. बोर्डाकडून नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली असून, यात राज्यातील विभागनिहाय निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. आज दुपारी एक वाजेनंतर विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेचा निकाल विभागाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे.

यंदा राज्यात बारावीचा निकाल हा ९३.३७% इतका लागला आहे. तर, गेल्या वेळेप्रमाणे यंदाही कोकण विभागाने निकालात बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल हा ९१.५१% इतका लागला आहे. तर त्यापाठोपाठ ९१.९५% निकालासह मुंबई विभाग तळाशी आहे. तर, यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच मारली बाजी मारली असून, ९५.४४% मुली आणि ९१.६०% मुलं उत्तीर्ण झाले आहेत.  (Maharashtra HSC 12 Results)

HSC Result | तारीख ठरली..!; उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल

Maharashtra HSC 12 Results | विभागनिहाय निकाल

  • कोकण – ९१.५१ %
  • पुणे – ९४.४४ %
  • कोल्हापूर – ९४.२४ %
  • अमरावती – ९३ %
  • छत्रपती संभाजीनगर – ९४.०८ %
  • नाशिक – ९४.७१ %
  • लातूर – ९२.३६ %
  • नागपूर – ९३.१२ %
  • मुंबई – ९१.९५ %

CBSE 10th 12th Results | एकाच दिवशी १० वी आणि १२ वीचाही निकाल जाहीर

येथे पहा निकाल   

आज दुपारी १ वाजेनंतर विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here