Gram Panchayat Strike | आजपासून राज्यातील सर्व ग्रामपंचायती कुलूप बंद; सरपंच संघटनेचे आंदोलन

0
86
Gram Panchayat Strike
Gram Panchayat Strike

Gram Panchayat Strike | भंडारा :  उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरपंच संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला आहे. यापूर्वी ग्रामपंचायतींना (Gram Panchayat) 15 लाखांपर्यंत विकास कामं करता येत होती. मात्र, 10 जुलै रोजी उच्च न्यायालयाने (High Court) हा निर्णय बदलत ग्रामपंचायतीच्या या विकास निधीवर कात्री लावत केवळ तीन लाखापर्यंतची कामं करण्याची परवानगी दिली आहे.

त्यामुळे यानंतर ग्रामपंचायतींना केवळ तीन लाखापर्यंतचीच विकासकामं करता येणार आहे. या निर्णयाला सरपंच, ग्रामपंचायत संघटनांचा विरोध असून, राज्य सरकारने या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे आणि स्टे आणून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे 15 लाखांपर्यंत कामं करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. तर, यासाठी सरकारला 15 ऑगस्टपर्यंतचा वेळही देण्यात आला होता.(Gram Panchayat Strike)

Gram Panchayat Strike | ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प?; सरकारची डोकेदुखी वाढणार

तसेच जर 15 ऑगस्टपर्यंत राज्य सरकारने याप्रकरणी लक्ष घातले नाहीतर 16 ऑगस्टपासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना कुलूप बंद आंदोलन करण्याचा इशाराही सरपंच संघटनेतर्फे देण्यात आला होता. त्यानुसार आजपासून राज्यातील ग्रामपंचायतींना कुलूप बंद आंदोलन करून उच्च न्यायालाच्या या निर्णयाला सरपंच संघटनेने विरोध दर्शविला आहे.

Gram Panchayat Strike |  तोडगा निघत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत बंद

उच्च न्यायालयाच्या 15 लाखापर्यंतच्या कामांची मर्यादा ही 3 लाखांवर आणण्याच्या निर्णयाविरोधात रआज सरकारने भूमिका घ्यावी आणि सुप्रीम कोर्टात या निर्णयावर 15 ऑगस्टपर्यंत स्टे आणावा, अशी मागणी सरपंच संघटनेने केली होती. मात्र, यावर कालपर्यंत कुठलाही तोडगा न निघाल्याने आजपासून राज्यातील ग्रामपंचायतींना कुलूप लावत ग्रामपंचायत बंद करून आंदोलन सुरू केले आहे. तसेच जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून, या ग्रामपंचायतींना कुलूप ठोकून लावलेल्या कुलपांच्या चाव्या ह्या ही गटविकास अधिकाऱ्यांकडे आंदोलकांनी सोपविल्या आहेत.

Gram Panchayat Elections Result | ठरलं तर मग..! बघा जिल्ह्यात कुठे कोणाचा गुलाल


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here