तुमच्याकडून सल्ले ऐकण्याइतकं भिकारीपण महाराष्ट्राला आलेलं नाही; राऊतांचा राणा दाम्पत्याला टोला

0
21

The point now: अमरावतीचे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आक्रमक झालेले असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केलाततर ,लक्षात ठेवा… शिवसैनिक स्वतःचं रक्षण करण्यासाठी खंबीर आहेत. शिवसैनिक मारायला आणि मरायला सदैव तयार आहेत. केवळ आमचं सरकार असल्यामुळे पोलिसांचं संरक्षण घेतलं जातयं. कायदा आणि सुव्यवस्थेचे धडे आम्हाला शिकवू नका, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. तर, राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आक्रमकता स्विकारल्याने घेतल्यामुळे शेकडो शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले आहेत.

त्यानंतर राऊत राणा दाम्पत्य आणि त्यांच्या पाठिंबा देणार्‍या भाजपाला इशारा देताना म्हणाले की , ‘ कुणाच्या तरी पाठबळानं तुम्ही मुंबईत येऊन आमच्या मातोश्रीत घुसण्याच्या तयारीत असाल तर शिवसैनिक काय स्वस्थ बसतील का.. कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी आम्हाला सांगू नका… सरकारने काय करायला पाहिजे… मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहिजे.. हे सल्ले तुमच्याकडून ऐकण्याइतकं भिकारीपण महाराष्ट्राला आलेलं नाही…. असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.

पुढे भाजपाला इशारा देताना संजय राऊत म्हणाले, “कोण आहात तुम्ही .. काय लायकी आहे तुमची?आम्हाला धमक्या देऊ नका.. हिंमत असेल ईडी, सीबीआय लावा..शिवसैनिकांवर आता कुणाचाही कंट्रोल नाही. ही काहीही सुरुवात झालेली नाही. दोन दिवसांत झालेल्या घटना या फक्त शिवसैनिकांच्या मनातील भावना नाही, तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील राग आहे असा अल्टिमेटम संजय राऊत यांनी दिला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here