Magh Gupt Navratri | कालपासून माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीला सुरुवात झाली. ज्या लोकांना विशेष सिद्धी प्राप्त करायची असते. ते या नवरात्रीत गुप्त पद्धतीने पूजा पाठ करतात. या काळात हे ९ दिवस उपासक दुर्गा देवीच्या ९ रूपांचे भक्तिभावाने पूजन करतात. पौराणिक कथांनुसार या ९ दिवसांत ‘गुप्त’ रूपाने पूजापाठ केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. ही गुप्त नवरात्री १८ फेब्रुवारी रोजी समाप्त होणार आहे. दरम्यान, या काळात काही विशेष पद्धतीने पूजा पाठ केल्यास तुमच्यावर देवीची विशेष कृपा होते. मात्र, यादरम्यान काही कामे टाळली पाहिजेत. या काळात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. हे आपण जाणून घेणार आहोत. (Magh Gupt Navratri)
Chhagan Bhujbal | विणकरांसाठी मंत्री छगन भुजबळ मैदानात; केली ही मागणी
Magh Gupt Navratri | अवश्य करा ‘ही’ कामे
- १० ते १८ फेब्रुवारीच्या या गुप्त नवरात्रीच्या काळात कर्जामधून मुक्त होण्यासाठी दुर्गा देवीसमोर धूप, दीप प्रज्वलित करावा, यामुळे जूने किंवा नवे कर्ज किंवा देने यातून मुक्ती मिळते.
- गुप्त नवरात्रीच्या काळात लक्ष्मी देवीची पूजा करताना देवीला कमळ पुष्प अर्पण करावे. तुमच्याकडे कमळाचे फूल उपलब्ध नसल्यास तुम्ही कमळाच्या फुलाचा फोटो देखील देवीसमोर ठेवू शकतात, असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.(Magh Gupt Navratri)
- जर तुम्ही गुप्त नवरात्रीच्या काळात सोने किंवा चांदीचे नाणे घरी आणले. तर, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. या नण्यामुळे आपल्या घरात संपत्ती, आनंद तसेच आर्थिक भरभराट येते.
- माघ महिन्यातील या नवरात्रीच्या दरम्यान, देवी दुर्गेला लाल रंगाची फुलं अर्पण करावीत. तसेच जर तुमच्या घरात एखादी आजारी व्यक्ती असेल, तर त्यांचाही आजार कमी होण्यास मदत होईल. याबरोबरच “ऊं क्रीं कालिकायै नम:” या मंत्राचा जप करावा, यामुळे घरातील आजारी व्यक्तीवर देवीची कृपा होते.
- या गुप्त नवरात्रीच्या काळात आपल्या घरात मोराचं पीस आणणे हे शुभ मानले जाते. मोर हे देवी लक्ष्मीचे वाहन असून, घरात मोर पीस आणल्यामुळे तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा ही कायम राहते.
Shattila Ekadashi | आजच्या ‘षटतिला एकादशी’ला हे उपाय कल्याने होईल धनलाभ
ही कामे वर्ज्य आहेत
- गुप्त नवरात्रीच्या काळात लहान मोठ्यांसोबत चांगले वागा. तसेच कोणालाही तुच्छ लेखू नका किंवा अपशब्द बोलू नका.
- या कालावधीत केस कापू नये, दाढी करू नये किंवा नखंही कापू नये.
- देवीची पूजा करताना पूजेच्या वेळी लाल, पिवळे किंवा शुभ्र कपडे घाला, काळ्या रंगाचे कपडे घालू नये.
- नवरात्रीच्या काळात मांसाहारी खाणे, दारू किंवा धुम्रपान करणे टाळावे.
- या ९ दिवसांत कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करु नये.
- गुप्त नवरात्रीच्या काळात स्त्रीयांचा अपमान करू नये. हिंदू धर्मात कन्यांना देवीचे रूप मानले जाते.
- या काळात केलेली तुमची उपासना गुप्त ठेवावी. (Magh Gupt Navratri)
(टीप : वरील सर्व बाबी ‘द पॉइंट नाऊ’ केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम