LPG Rate | सरकारने दिलेय महिलांना हे ‘न्यू इयर गिफ्ट’

0
37
LPG Rate
LPG Rate

LPG Rate |  नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारने महिलांना न्यू इयर गिफ्ट दिले आहे. दरम्यान, महिलांसाठी ही आनंदाची बातमी असून, एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती ह्या कमी झाल्या आहेत. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी हा निर्णय घेतला असून, आता एलपीजी सिलिंडरच्या किंमती ह्या कमी झाल्या आहेत.

दरम्यान, आजपासून देशातील सर्व ‘मेट्रो सिटीज’ मध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती ह्या घासरल्या आहेत. तसेच, यानंतर आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना आता प्रत्येक सिलिंडरवर सुमारे ४० रुपये कमी मोजावे लागणार आहे. तसेच घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. LPG Rate

Entertainment News | जिराफ थिएटर्सच्या ‘गुडबाय किस’ चा नाशकात रंगणार प्रयोग

सिलिंडरच्या दर कमी |(LPG Rate)

दरम्यान, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारीपूर्वीच ह्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती ह्या कमी करण्यात आलेल्या आहेत. आजपासून म्हणजेच २२ डिसेंबरपासून दिल्ली ते पाटणापर्यंत एलपीजी सिलिंडर हे ३९.५० रुपयांनी स्वस्त झाले असून दारांमधील ही कपात केवळ १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांत करण्यात आलेली आहे. तसेच घरगुती वापररासाठीच्या गॅस सिलिंडरचे दर हे जसे आधी होते तसेच असून, त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. LPG Rate

Alcohol news | ‘थर्टीफर्स्ट’साठी मद्यप्रेमींना राज्य सरकारची ‘गुड न्यूज’

तसेच आजपासूनच राजधानी दिल्लीमध्ये इंडेन व्यावसायिक सिलिंडर हे १,७५७ रुपयांना मिळणार आहे. हा सिलेंडर यापूर्वी १,७९६.५० रुपयांमध्ये मिळत होता. दरम्यान, ह्याच १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर हे कलकत्ता शहरात आता १,८६८.५० रुपये असे आहेत. तसेच मुंबई मध्ये ह्या १९ किलो व्यावसायिक सिलिंडरचे दर हे १,७४९ ऐवजी आता १,७१० रुपयेयांवर आले आहे. दरम्यान, आता ह्या महिन्यातच १ डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर हे वाढवण्यात आले होते. तसेच, यापूर्वी १६ नोव्हेंबर रोजी ही व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर हे १०० रुपयांनी वाढले होते.LPG Rate

कोठे कअसे आहेत दर..?

१. दिल्ली मध्ये दर हे १,७५७ असे आहेत.

२. कोलकाता मध्ये दर हे १,८६८.५० असे आहेत.

३. मुंबई मध्ये दर हे १,७१० असे आहेत.

४. चेन्नई मध्ये दर हे १,९२९ असे आहेत. LPG Rate


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here