राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | गॅस कनेक्शन धारकांनी केवायसी करणे करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु अनेक गॅस धारकांनी अद्यापही केवायसी न केल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना अडचणी येत असून, आता केवायसी न केल्यास केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन बंद केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच केवायसी (KYC) नसलेल्या ग्राहकांना सबसिडीही (subsidy) मिळणार नाही. प्राप्त माहितीनुसार केवायसी करण्यासाठी गॅस ग्राहकांना काही दिवसांपूर्वीच संबंधित गॅस कंपनी एजन्सीकडून सूचित करण्यात आले होते. यासाठी ग्राहकांना 31 मे ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र, तरीही या मुदतीत अनेकांनी केवायसी केली नसल्याचे दिसत आहे. सर्वच गॅस धारकांना केवायसी करणे अनिवार्य आहे.(LPG Gas)
केवायसी न करणाऱ्या नियमित ग्राहकांना तसेच उज्वला योजनेच्या (Ujjwala Gas Scheme) गॅस धारकांना ३०० रुपये दिली जाणारी सबसिडी कायमची बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅस सेवेचा लाभ घेणाऱ्या सर्व ग्राहकांनी केवायसी करून घ्यावी असे आवाहन स्थानिक गॅस एजन्सी धारकांकडून करण्यात येत आहे. अंतिम मुदतीपर्यंत गॅस धारकांनी केवायसी करणे आवश्यक आहे. अन्यथा सबसिडीसह इतर बाबी संबंधित ग्राहकांना मिळणार नसल्याचे चित्र आहे.
LPG Gas price Hike: महागाईचा भडिमार! एलपीजीच्या दरात पुन्हा वाढ, आता या किमतीला मिळणार सिलेंडर
LPG Gas | केवायसीसाठी ही कागदपत्रे आवश्यक
गॅस धारकांनी एजन्सीमध्ये जाऊन केवायसी करून घ्यावी. त्यासाठी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, जोडणी ग्राहकाचे पुस्तक, ग्राहकांचे फेस रिडींग किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून त्या माध्यमातून केवायसी करता येते. यासाठी अंतिम तारीख 31 मे 2024 ही आहे.(LPG Gas)
यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांची काही बंधने नसल्याने गॅस नियमानुसार उपलब्ध होत होता. परंतु आता केवायसीसाठी कडक नियम केले असल्याने केवायसी नसल्यास ग्राहकांना गॅस दिला जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी अंतिम मुदतीच्या आत केवायसी करून घ्यावी.
– किसन गाढवे (संचालक, ईश्वरी गॅस एजन्सी धामणगाव)
LPG Price | सर्वसामान्यांच्या खिशाला चटका!; सिलिंडरच्या दरात वाढ,
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम