नवी दिल्ली – वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य आधीच त्रस्त झालेला असताना आज इंधन कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. आज घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली आहे, नव्या दरानुसार गॅस सिलेंडर आता हजाराच्या घरात गेला आहे. यांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
राजधानी दिल्लीत घरगुती सिलेंडरसाठी १०५३ रुपये, कोलकातामध्ये १०७९, मुंबईत १०५२ तर चेन्नईत १०६८ रुपये इतके मोजावे लागणार आहेत. मात्र १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ८.५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम