Skip to content

नाशिकमध्ये सुफी संताची गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोर फरार, पोलीस तपासात गुंतले


नाशिक: नाशिक जिल्ह्यात एका मुस्लिम धर्म गुरूची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ३५ वर्षीय सूफी संताची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा सुफी बाबा अफगाणिस्तानचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जणांनी ही घटना घडवली आहे. खुनाची ही घटना येवला तालुक्यातील चिचोंडी एमआयडीसी परिसरात घडली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाण नागरिक सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांचे वय सुमारे 35 वर्षे होते. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

नाशिकमध्ये सुफी संताची हत्या का झाली?

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अफगाणिस्तानातील एका सुफी संताची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. येवला तालुक्यातील चिचोंडी एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे. मात्र, हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती असे मृताचे नाव आहे. 4 जणांनी ही घटना घडवली आहे. हत्येनंतर चार अज्ञात इसम चारचाकी वाहनातून फरार झाले.

आर्थिक वादातून खून झाला का?

महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सुफी बाबाच्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती हा अफगाण धर्मगुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. पोलिसांचे पथक मारेकऱ्यांचा शोध घेत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!