Loksabha Election | महायुतीत (Mahayuti) पाच जागांचा तिढा सुरू होता. यापैकी आज ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असून, या जागेसाठी ते प्रचंड आग्रही होते. मात्र, भाजपही या जागेसाठी इच्छुक असल्याने हा तिढा सुटत नव्हता. दरम्यान, अखेर ठण्याची जागा आपल्याकडे घेण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले असून, ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी आपला विश्वासू शिलेदार मैदानात उतरवला आहे. आज शिंदे गटाने कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. यानुसार, कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे आणि ठण्यातून नरेश म्हसके (Naresh Mhaske) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Loksabha Election)
काल शिंदे गटाची बैठक झाली असून, यात तिढा असलेल्या जागांवरील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी ही बैठक झाली असून, यात अंतीम निर्णय झाला आहे. यावेळी नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे हे उपस्थित होते. या सर्वांची नवे चर्चेत होती. मात्र, उर्वरीत सर्वांची समजूत घालून आज नरेश म्हसके यांच्या नावाची घोषणा झाली आहे. (Loksabha Election)
Loksabha Election | महायुतीचं जागावाटप 24 तासांत फायनल; ही आहेत संभाव्य नावे..?
ठाणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघडीने ठाकरे गटाचे विद्यमान खासदार रंजन विचारी यांनी पुन्हा एकदा संधी दिली असून, त्यांच्या प्रचारालाही सुरुवात झाली. मात्र, अद्यापही महायुतीने आपला उमेदवार जाहीर केला नव्हता. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, राजन विचारे यांनी उमेदवारी अर्जही घेतला. मात्र, महायुतीकडून कोणीही उमेदवारी अर्ज घेतला नव्हता. दरम्यान, आता उद्या नरेश म्हसके हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
बालेकिल्ला राखण्यात शिंदेंना मोठे यश
ठाणे लोकसभेचा तिढा हा अनेक दिवसांपासून कायम होता. या जागेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातील अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु होती. यात शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक, मिनाक्षी शिंदे यांची नावे आघाडीवर होती. तर, भाजपकडून संजय केळकर इच्छुक होते. हा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक बैठका घेतल्या. यानंतर अखेर ठाण्याचा बालेकिल्ला राखण्यात एकनाथ शिंदेंना मोठे यश मिळाले आहे. भाजपचा आग्रह मोडीत काढत एकनाथ शिंदेंनी आपा बालेकिल्ला मिळवला. (Loksabha Election)
Loksabha Election | मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही – आमदार डॉ. राहुल आहेर
Loksabha Election | कोण आहेत नरेश म्हसके..?
शिवसेनेत फुट पडल्यानंतर पहिल्या दिवसापासून म्हस्के यांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा होता. तर, ठाकरे गटातून सर्वात पहिली हकालपट्टी ही नरेश म्हस्केंची करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठतेचे आणि विश्वासाचे फळ त्यांना एकनाथ शिंदेंनी दिले आहे. म्हस्के हे मागील अनेक वर्षापासून ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक आणि सभागृह नेते होते. तसेच ते ठाण्याचे महापौर देखील राहिलेले आहेत. (Loksabha Election)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम