Loksabha Election | मोदींच्या राज्यात सर्वाधिक सभा; तर ८४ वर्षीही पवारांची हाफ सेंच्युरी..!

0
21
Loksabha Election
Loksabha Election

मुंबई :  देशात सध्या लोकसभा निवडणुकींचेच वातावरण असून, महाराष्ट्रात ५ टप्प्यात ही निवडणूक होत आहे. उद्या मुंबईसह पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी अशा एकूण १३ मतदार संघांत शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. तर, १८ मे रोजी राज्यातील सुरू असलेल्या प्रचाराची काल सांगता झाली.

गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) केवळ ४ ते ५ वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असतील. मात्र, या महिनाभरात ते तब्बल १८ वेळेस महाराष्ट्रात आले आहेत. गेल्या २ महिन्यांपासून राज्यात ही रणधुमाळी सुरू होती. मोठमोठ्या जाहीर सभा, प्रचार रॅली, रोड शो, च्या माध्यमांतून सर्वांनीच जोरदार शक्तिप्रदर्शन केले.  सर्वच राजकीय दिग्गज या निवडणुकांसाठीच्या प्रचारात व्यस्त असल्याचं दिसून आलं. (Loksabha Election)

मोदी सर्वाधिक सभा घेणारे राष्ट्रीय नेते 

दिल्ली ते गल्ली सर्वच नेते प्रचारासाठी जुंपलेले होते. तर, यंदा केंद्रीय नेत्यांनीही ही निवडणुक चांगलीच मनावर घेतल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात जास्त लक्ष दिले असून, यंदा त्यांनी राज्यात दीडपट अधिक सभा घेतल्या आहेत. तर, मोदींनी महाराष्ट्रात तब्बल १८ सभा घेतल्या आहेत.

८ एप्रिल रोजी चंद्रपुर येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ राज्यात पहिली सभा घेतली यानंतर त्यांचा सभांचा धडाका सुरू झाला. तर, १८ सभा घेत या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक सभा घेणारे राष्ट्रीय नेते ठरले आहेत. तर, अमित शाह यांनी ७ सभा घेतल्या असून, ते दुसऱ्या ठिकणी आहे. (Loksabha Election)

Loksabha Election | ताकद लावून गोडसेंना निवडून आणू; उपमुख्यमंत्र्यांचा निर्धार  

८४ वर्षीही शरद पवारांची हाफ सेंच्युरी..!  

दरम्यान, केंद्रीय नेत्यांसह राज्यातील नेत्यांनीही आपली ताकद पणाला लावली होती. राज्यातील नेत्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक सभा या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या असून, त्यांनी शतक पार करत तब्बल ११५ सभा घेतल्या आहेत. तर, त्यांच्या पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शतक पार केले आहे.

शरद पवार यांनी ६० पेक्षा जास्त सभा घेतल्या आहेत. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४८ सभा घेतल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी ३० पेक्षा जास्त सभा घेतल्या आहेत. तर, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ४ सभा घेत लोकसभा निडवणुकीत महायुतीसाठी आपलं योगदान दिलं आहे.

Loksabha Election | शिवसेनेकडून ‘या’ बहुप्रतीक्षित जागांवरील उमेदवार जाहीर

राहुल गांधींच्या २, केजरिवाल यांची १ सभा 

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात काँग्रेससह आपच्याही काही राष्ट्रीय नेत्यांनी सभा घेतल्या. यात, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दोन सभा घेतल्या असून, यात इंडिया आघाडीची सांगता सभा ही त्यांची दुसरी सभा होती. तर, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनीही महाराष्ट्रात प्रत्येकी दोन दोन सभा घेतल्या. राहुल गांधींनी सोलापूर येथे प्राणिती शिंदेंच्या व पुणे येथे रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. तर, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही एक सभा घेतली आहे. (Loksabha Election)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here