Lok Sabha Election Voting 2024 | महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्याचे मतदान; ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

0
46
Vidhanparishad
Vidhanparishad

Lok Sabha Election Voting 2024 |  आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे. यात राज्यातील महत्त्वाच्या जागांवर मतदान (Lok Sabha Election Phase 5 Voting) पार पडणार आहे. मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागांवर हे मतदान होणार आहे.

संपूर्ण देशातील एकूण ६ राज्यात आणि दोन केंद्रशासित प्रदेशात एकूण ४९ जागांसाठी मतदान (Voting) पार पडत आहे. मुंबईतील (Mumbai Lok Sabha Election 2024) सहा मतदारसंघ, ठाणे (Thane Lok Sabha Election 2024), कल्याण (Kalyan Lok Sabha), भिवंडी (Bhiwandi Lok Sabha), नाशिक (Nashik Lok Sabha), दिंडोरी (Dindori Lok Sabha) आणि धुळे (Dhule Lok Sabha) अशा तब्बल १३ जागांवर डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिहिर कोटेचा, अरविंद सावंत, अनिल देसाई, उज्ज्वल निकम, अमोल कीर्तिकर, पियुष गोयल, वर्षा गायकवाड या दिग्गज नेत्यांचं भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.

तर, या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची परतिष्ठा पणाला लागणार आहे. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या केंद्रीय नेतृत्वांचाही समावेश आहे.

Loksabha Election | मोदींच्या राज्यात सर्वाधिक सभा; तर ८४ वर्षीही पवारांची हाफ सेंच्युरी..!

Lok Sabha Election Voting 2024 | ‘या’ हायव्होल्टेज लढती 

  1. मुंबई उत्तर – पीयूष गोयल (भाजप) भूषण पाटील (काँग्रेस)
  2. मुंबई उत्तर मध्य: उज्ज्वल निकम (भाजप) वर्षा गायकवाड (काँग्रेस)
  3. मुंबई दक्षिणः अरविंद सावंत (ठाकरे गट) यामिनी जाधव (शिंदे गट)
  4. मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिंदे गट) यांची अनिल देसाई (ठाकरे गट)
  5. मुंबई उत्तर-पश्चिम: रवींद्र वायकर (शिंदे गट ) हे अमोल कीर्तिकर (ठाकरे गट)
  6. मुंबई ईशान्य : संजय दिना पाटील (ठाकरे गट) विरुद्ध मिहीर कोटेचा (भाजप)
  7. कल्याण : वैशाली दरेकर-राणे (ठाकरे गट) विरुद्ध डॉ.श्रीकांत शिंदे (शिवसेना)
  8. ठाणे : राजन बाबुराव विचारे (ठाकरे गट) विरुद्ध  नरेश म्हस्के (शिवसेना)
  9. भिवंडी : कपिल पाटील (भाजप) विरुद्ध सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी)
  10. पालघर: हेमंत सवरा (भाजप) विरुद्ध भारती कामडी (ठाकरे गट)
  11. धुळे : भामरे सुभाष रामराव (भाजप) विरुद्ध शोभा बच्छाव (काँग्रेस)
  12. दिंडोरी : भास्कर भगरे (शरद पवार गट) विरुद्ध डॉ. भारती पवार (भाजप)
  13. नाशिक : हेमंत गोडसे (शिंदे गट) विरुद्ध राजाभाऊ वाजे (ठाकरे गट)

Lok Sabha Election Voting | राज्यात सर्वात कमी मतदान; बघा कुठे किती टक्के मतदान..?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here