Lok Sabha Election | देवळ्यात ९६ वर्षीय आजींनी बजावला हक्क; नाशिक, दिंडोरीत ‘इतके’ मतदान

0
33
Lok Sabha Election
Lok Sabha Election

Lok Sabha Election |  आज उत्तर महाराष्ट्रासह, मुंबईतील सहा मतदार संघात मतदान होत असून, येथे उमेदवारांनी, नेतेमंडळींनी आणि अधिकाऱ्यांनीही आपला मतदानाचा हक्क (vote) बजावला आहे. तर,  दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मौजे डोंगरगाव येथे आणि देवळा तालुक्यातील एका ९६ वर्षीय आजींनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. नाशिकमध्ये १६.३% मतदान झाले असून, ३,३०,९१० मतदारांनी मतदान केले आहे. तर, दिंडोरीत १९.५% टक्के मतदान झाले असून, ३,६१, ४१० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

दरम्यान, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी नाशिक (votekarnashikkar) येथे मतदान केंद्र २२८ मतदान केले.  तर, बॉईज टाऊन स्कूल येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सहकुटुंब मतदान केले.  तर मनपा शाळा क्र. १४,१५ मखमलाबाद येथे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सहपत्नीक मतदानाचा हक्क बजावला आहे. (Lok Sabha Election)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ९६ वर्षीय आणि १०० वर्षीय आजींचे मतदान 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मौजे डोंगरगाव येथे साखराबाई बाबुराव आहेर या १०० वर्षांवरील आजींनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. तर, देवळा येथे ९६ वर्षीय तुळसाबाई आहेर या आजींनीही मतदानाचा हक्क बजावला.

Lok Sabha Election Voting 2024 | महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्याचे मतदान; ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

नेतेमंडळींनी बजावला मतदानाचा हक्क 

तसेच दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी दळवट (ता. कळवण) येथे मतदान केले. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी गोंडेगाव (ता. दिंडोरी), नाशिक लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी नाशिक येथे, मविआचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी सिन्नर येथे, शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी त्र्यंबकेश्वर, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मॉडर्न स्कूल सिडको येथे सहकुटुंब आणि मंत्री दादाजी भुसे यांनी मालेगाव येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

Dindori Lok Sabha | मालेगावात मतदानावर बहिष्कार; निफाडमध्ये टोमॅटो, कांदा माळ घालुन मतदान

Lok Sabha Election | जिल्ह्यातील बाजार समित्या बंद

दरम्यान, आज नाशिक आणि दिंडोरी येथे मतदान होत असून, मतदानाची टक्केवारी वाढवी. याकरीता नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीसह सर्व १७ बाजार समित्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, या उद्देश्याने प्रशासनाने आठवडे बाजार आणि बाजार समित्यांमधील लिलाव बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज जिल्ह्यातील १७ बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. (Lok Sabha Election)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here