Nashik Citylinc | नाशिकची जीवनवाहिनी पुन्हा बंद..?

0
20

Nashik Citylinc |  नाशिकची जीवनवाहीणी असणाऱ्या सिटीलिंक बस आता पुन्हा ऐन दिवाळीच्या तोंडावर बंद असणार आहेत. दिवाळीच्या सणात सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देणे हे ठेकेदार वाहक कंपन्यांना बंधनकारक आहे. त्यानुसार सिटीलिंक कंपनीने ठेकेदार मॅक्स डिटेक्टिव्ह कंपनीला निर्देश दिले आहे.

दरम्यान, वेतनाबरोबरच दिवाळीचे बोनस वेळेत न मिळाल्यास सिटीलिंक कर्मचारी हे ऐन दिवाळीत संपावर जाण्याच्या तयारीत आहे. सिटीलिंक कंपनीकडून ग्रॉस कॉस्ट कटिंग तत्त्वावर बससेवा चालविताना चालक आणि वाहकांची जबाबदारी ही कंत्राटदारावर आहे.

Rain Update | शेतकऱ्यांसमोर संकट; राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाची शक्यता

महापालिका ऑपरेटर कंपन्यांना किलोमीटरनुसार पैसे अदा करत असते. चालक आणि वाहकाचे काम हे मॅक्स डिटेक्टिव्ह ह्या कंपनीकडे आहे. आतापर्यंत दोन ते तीन वेळी सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी वेळेत वेतन मिळत नसल्यामुळे संप पुकारला आहे.

आता पूर्ण महिन्याचे तीस दिवस काम केल्यानंतर बोनसला पात्र तसेच नियमित वेतन दिवाळीपूर्वी मिळावे, अशी सिटीलिंक कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्याअनुषंगाने मागणी पूर्ण नाही झाली तर, पुन्हा संपावर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आता वाहकांचा पुन्हा संप झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून नाशिक महानगर पालिकेने शंभर वाहक पुरवठ्यासाठी नागपूर येथील युनिटी मॅनपॉवर ह्या कंपनीला दुसरा ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी झाली जाहीर


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here