जळगाव: संपूर्ण देशात गाजत असलेल्या महाराष्ट्र विधान परिषेदेचे निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केला असून या विजयाचा आंदोत्सव भाजपा कार्यालय वसंत स्मृती, बळीराम पेठ येथे आज मंगळवार दि. 21 जून रोजी सकाळी ११ वाजता भाजपा जळगाव महानगराच्या वतीने जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, डॉ.राजेंद्र फडके, माजी महापौर सीमाताई भोळे यांच्या प्रमुख उपस्थित पटाके फोडून, पेढे वाटप करून जल्लोषात विजयोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. राजेंद्र फडके यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील, संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन, जळगाव शहराचे आमदार व भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्या प्रयत्नाला यश आले असून, याहून समजते की, महाविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याचे पुन्हा दिसून येत आहे. महाराष्ट्र विधानपरिषद अभि झाकी है, अभि विधानसभा बाकी है असे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच जळगाव भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व पुढे म्हणाले राज्यसभेत जसा विजय प्राप्त केला, तसेच विधानपरिषद निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून देणारे महाराष्ट्राचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे खरे किंगमकर आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी बेटी बचाओ, बेटी पढाओचे राष्ट्रीय सह संयोजक डॉ.राजेंद्र फडके, भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, माजी महापौर सीमाताई भोळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, गटनेते भगत बालानी, विधानसभा क्षेत्रप्रमुख दिपक साखरे, जिल्हा पदाधिकारी सुशील हासवाणी, राजेंद्र मराठे , राहुल वाघ, ज्योतीताई निभोरे, वंदनाताई पाटील, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, माजी अध्यक्ष सुभाष शौचे, नगरसेवक धीरज सोनवणे, जितेंद्र मराठे, दीपमाला काळे, अॅड सुचिताताई हाडा, मंडल अध्यक्ष संजय लुल्ला, शक्ती महाजन, आघाडी अध्यक्ष, दिप्तीताई चिरमाडे, आनंद सपकाळे, सना जहांगीर खान, प्रल्हाद सोनवणे, रेखाताई वर्मा, सरोजताई पाठक, मिलिंद चौधरी, दिनेश पुरोहित, सागर जाधव. चेतन तिवारी, गौरव पाटील, अबोली पाटील, निखील सूर्यवंशी, गौरव दुसाने, शुभम पाटील, गणेश माळी, ललित बडगुजर, हितेश जोनवाल ,जयंत चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम