Lakshmi Narayan Yog | ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या संयोगाला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण या ग्रहांच्या संयोगामुळे अनेक शुभ व अशुभ योग हे तयार होत असतात. दरम्यान, असाच एक अत्यंत शुभ योग हा यावर्षी पुढील महिन्यात १२ फेब्रुवारी रोजी तयार होत आहे. या दिवशी शुक्र ग्रह हा मकर राशीत प्रवेश करेल. बुध ग्रह हा आधीपासून या राशीत असल्यामुने आता हे दोन ग्रह एकत्र येऊन या दिवशी ‘लक्ष्मी नारायण’ योग तयार करतील. ज्योतिष शास्त्रानुसार बुध आणि शुक्र हे दोन्ही शुभ ग्रह असून, विशेषत: धनप्राप्तीसाठी हा लक्ष्मी नारायण योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. तर, या शुभ प्रभावामुळे या दिवशी ३ राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. बघूयात त्या तीन राशी कोणत्या? आणि या दिवशी काय केल्याने तुम्हालाही या शुभ योगाचा फायदा होईल. (Lakshmi Narayan Yog)
Spiritual News | देवळा तालुक्यात भक्तिमय वातावरण; मंदिरांवर विद्युत रोषणाई
Lakshmi Narayan Yog | मेष राशी
पुढील फेब्रुवारी महिन्यात मेष राशीच्या लोकांना ‘लक्ष्मी नारायण’ योगामुळे फायदे होतील. त्यांना अनेक शुभ लाभ होतील. येणाऱ्या या शुभ योगामुळे तुमचे भाग्य उजळणार आहे. यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुमच्या आर्थिक अडचणी संपुष्टात येतील. यामुळे तुमचे जुने अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात आणि करिअरमध्येही याचे फायदे होतील. दरम्यान, या ‘लक्ष्मी-नारायण’ योगाच्या शुभ प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांची उत्तम आर्थिक प्रगती होईल. यामुळे तुमच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते. नवीन नोकरीच्या शोधत असलेल्यांना कुठूनतरी चांगली ऑफर किंवा एखादी उत्तम संधी मिळू शकते.
मिथुन राशी
लक्ष्मी नारायण योगामुळे मिथुन राशीच्या लोकांनाही उत्तम फायदा होईल. देवी लक्ष्मी आणि नारायणाच्या कृपेमुळे तुम्हाला सुख, सुविधा, आरोग्य, आणि संपत्तीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. या राशीच्या नोकरी वर्गातील लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी बढतीही मिळू शकते. या राशीच्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल त्यांच्या व्यवसायाचीही प्रगती होईल. तुमची सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लागतील. तुम्हाला या योगामुळे चांगला आरोग्यविषयक फायदाही होऊ शकतो. यामुळे तुमच्यात ऊर्जा व आत्मविश्वास वाढेल. तसेच विद्यार्थ्यांना तुमच्या करिअरमध्ये याचा तुम्हाला फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्यास मदत होईल. तुम्ही एखादे नवे काम किंवा व्यवसायही याकाळात सुरू करू शकतात. कारण या काळात तुमची व्यावसायिक प्रगतीही होऊ शकते.
Spiritual News | देवळा ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरात उद्यापासून शाकंभरी पौर्णिमा उत्सव
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यातही या ‘लक्ष्मी नारायण’ योगाचे उत्तम फायदे मिळतील. या शुभ योगामुळे तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक परिणाम होतील. लक्ष्मी-नारायणाच्या कृपेनेमुळे तुमच्यावर या काळात धन वर्षा होईल. कारण तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होऊन तुमची आर्थिक प्रगती होईल. या काळात तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक सुवर्ण संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर व व्यवसायातही लाभ होऊ शकतात. कन्या राशीच्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात मोठे यश मिळेल. हा लक्ष्मी नारायण योग तुमच्या आयुष्यात भरभराट घेऊन येणार आहे. याकाळात जर तुम्ही कुठेतरी केली किंवा एखादी जुनी गुंतवणूक असेल, तर या योगामुळे तुम्हाला त्याचा चांगला नफा मिळू शकतो. (Lakshmi Narayan Yog)
(टीप- वरील बाबी ‘द पॉइंट नाऊ’ हे फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कुठलाही दावा करत नाही किंवा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम