यवतमाळ : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. मागील दोन महिने या योजनेची चर्चा सर्वत्र चालू आहे. सध्या महायुतीकडून राज्यभरात विविध ठिकाणी माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यवतमाळ येथे देखील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी लाडक्या बहिणींनी धुमाकूळ घातल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. नेमकं काय होतं प्रकरण जाणून घेऊयात.
Sanjay Shirsat | “ते पावसात भिजतायत, आम्हालाही शॉवर लाऊन भाषणं करावी लागतील; शिंदे गटाचा सणसणीत टोला
यवतमाळ मधील किन्ही गावात आज महायुती सरकार तर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवत चांगल्या प्रमाणात हजेरी लावली होती. दरम्यान मुख्यमंत्री जमलेल्या महिलांना संबोधन करत असताना काही महिलांनी गोंधळ घातल्यामुळे कार्यक्रम काही काळात पुरता थांबविण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी झाली घोषणाबाजी
यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण कार्यक्रमाला महिलांनी चांगल्या प्रमाणात हजेरी लावली होती. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केले, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा भाषणास सुरुवात केली तेव्हा सभेमध्ये उपस्थित काही ‘महिलांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा’ अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. महिलांकडून देणाऱ्या या घोषणा अचानक सुरू झाल्यामुळे सभेमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे काही काळासाठी कार्यक्रम स्थगितही करण्यात आला होता. कार्यक्रम स्थळे उपस्थित पोलिसांकडून लगेचच या महिलांना ताब्यात घेण्यात आले परंतु त्यानंतरही त्यांच्या घोषणा थांबल्या नाहीत.
Ajit Pawar | ‘अशा आरोपींचं सामानच काढून टाकलं पाहिजे’; बदलापूर प्रकरणावरुन दादांना राग अनावर
काय म्हणाले मुख्यमंत्री
“या सरकारने लोकांना जे हवं आहे ते दिलं आहे. एक 1 कोटी 7 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. याबद्दल मी तुमचे सर्वप्रथम अभिनंदन करतो. पूर्वी सरकारी काम त्यानंतरही सहा महिन्यांची प्रतीक्षा असा कारभार होता. परंतु आता योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार नाही. त्याचबरोबर विरोधक ही योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु हे घेणारं सरकार नाहीतर देणारं सरकार असल्यामुळे ही योजना कधीच बंद होणार नाही. सोबतच आता वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. असे म्हणत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम