Krushi varta : महाराष्ट्र राज्य सरकारने एक रुपयांमध्ये खरीप पिक विमा योजनेची अंमलबजावणी केली आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्याची मुदत तीन ऑगस्टला संपुष्टात आली आहे.
दरम्यान या कालावधीमध्ये राज्यातील एक कोटी तीस लाख पासष्ट हजार दोनशे सत्तावन्न हेक्टर क्षेत्रापैकी एक कोटी बारा लाख बेचाळीस हजार पाचशे चौसष्ट हेक्टरवर पेरण्यात आलेल्या खरीप पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरवला आहे. जो एकूण हेक्टर क्षेत्रापैकी 86 टक्के इतका आहे.
मागील वर्षी जवळपास 96 लाख 62 हजार 260 शेतकऱ्यांनी आपल्या खरीप पिकाचा विमा उतरवला होता त्याच्या तुलनेत यंदा 175 टक्क्यांनी वाढ झाली आहे एक कोटी 69 लाख 48 हजार 800 शेतकऱ्यांनी या योजनेला प्रतिसाद दिला असून राज्यामध्ये पावसाने 103% हजेरी लावली असली तरी पुणे आणि नाशिक विभागांमध्ये पावसाचा जोर सरासरीपेक्षा कमी आहे.
https://thepointnow.in/corruption/
यातच पावसाने दडी दिल्यामुळे पिकांच्या वाढीवर देखील विपरीत परिणाम होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. यामुळे यंदाचा खरीप हंगाम खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना लागलेली आहे.
विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. आणि या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना 2016 सालापासून राबवण्यात येत आहे. यंदाची ही पीक विमा योजना बीड पॅटर्न नुसार राबवण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभाग अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
या योजनेनुसार पिक विमा कंपनीवर विमा हप्त्याच्या 110 टक्क्यांपर्यंत दायित्व राहणार असून यापेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासनाकडून करण्यात येणार आहे तर नुकसान भरपाई ही विमा हप्त्याच्या 80% पेक्षा कमी असल्यास विमा कंपनी विमा हप्त्याच्या 20% रक्कम स्वतःकडे ठेवून शिल्लक रक्कम राज्य शासनाला परत करणार आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 2016 सालापासून ते 2022 पर्यंत साधारण 22,629 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
या पिकांचा आहे योजनेत समावेश
भात, खरीप, ज्वारी, नाचणी, बाजरी, मका, तूर, उडीद, मूग, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबीन, कारळे, कांदा, कापूस
पिकनिहाय पेरणी क्षेत्राची टक्केवारी
बाजरी – 47, ज्वारी 36, मका 92, भात 77, नाचणी 68, मूग 41, भुईमूग 67, तुर 82, उडीद 59, सूर्यफूल 12, तीळ 27, कारळे 33, सोयाबीन 116 कापूस 98, मका 92
योजनेमध्ये कुणाचा किती हिस्सा?
पिक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी एक कोटी 63 लाख 71 हजार 926 शेतकरी हे बिगर कर्जदार असून पाच लाख 76 हजार 864 शेतकरी हे कर्जदार आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी एक रुपयाप्रमाणे एक कोटी 69 लाख 52 हजार 385 रुपये भरले असून राज्याचा यामध्ये हिस्सा 4 हजार 755 कोटी 30 लाख रुपये इतका आहे. तर केंद्र सरकारचा 3 हजार 216 कोटी 28 लाख रुपये इतका हिस्सा असून यामध्ये एकूण सात हजार 973 कोटी 27 लाख रुपये पिक विमा उतरवणाऱ्या कंपन्यांना हप्त्यापोटी मिळत आहेत.(krushi varta)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम