Kolhapur News | कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेच्या शाळेत प्रार्थने वरून पालकांनी आक्षेप घेत गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. शाळेत पालकांनी वाद घातल्याची बातमी पसरतात शाळेच्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर या शाळेत हा प्रकार घडला असून पालक व नागरिक या शाळेबाहेर गोळा झाल्याने याची खबर पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलीस देखील शाळेत दाखल झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तयार करण्यात आला आहे.
kolhapur | ‘गोकुळ’ विरोधात शेतकरी आक्रमक; कार्यालय व चिलिंग सेंटरची मोडतोड
नेमके प्रकरण काय?
या शाळेत विद्यार्थ्यांकडून हिंदी भाषेतील एक प्रार्थना दररोज बोलून घेतली जाते. या प्रार्थनेत ’यह मत कहो खुदा से’ असा शब्दप्रयोग आहे. या वाक्याच्या निमित्ताने संपूर्ण प्रार्थनेवर पालकांनी आक्षेप घेतला असून हे शाळेत मुलांना विविध प्रकारची शिक्षा देत असल्याचा आरोपही पालकांकडून करण्यात आला आहे.
kolhapur | प्रेयसीच्या घरात शिरून वायरीनं तिचा गळा आवळला
शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका यांनी नेमकं काय घडलं याबाबत स्पष्टीकरण दिलं देत, “19 नोव्हेंबर रोजी शाळेत परिपाठाच्या वेळी ‘यह मत कहो खुदा से’ ही प्रार्थना लावण्यात आली होती. यावर या भागातील नागरिकांनी आक्षेप घेतला असूनही प्रार्थना शाळेत आठ ते दहा वर्षांपासून घेतली जात आहे. परंतु नागरिकांकडून घेण्यात आलेल्या आक्षेपनंतर शाळेमध्ये ही प्रार्थना घेतली जाणार नाही.” असं पालक व नागरिकांना सांगण्यात आलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम