kolhapur | प्रेयसीच्या घरात शिरून वायरीनं तिचा गळा आवळला

0
58

Kolhapur : कोल्हापुरातील इचलकरंजी परिसरात बुधवारी (४ ऑक्टोंबर) अत्यंत धक्कदायक घटना घडली. चार वर्षांचे प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून एका तरुणाने प्रेयसीच्या घरात शिरून तिचा वायरीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. या संपुर्ण घटनेत पीडित महिला थोडक्यात बचावलेली असून आरोपी तरुणाविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.(Kolhapur) 

Deola | शेतकरी वर्गात अस्वस्थता; खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची खंत व्यक्त

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप राजेंद्र पागडे (वय, ३४) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपी हा कोल्हापुरातील तारदाळ येथील रहिवाशी असून त्याचे आणि पीडित महिलेचे गेल्या वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, यानंतर पीडित महिलेने काही कारणास्तव आरोपीशी असलेले प्रेमसंबंध तोडून टाकले. त्यावेळी पीडित महिलेने आरोपीकडून स्टॅम्प पेपरवर लिहून देखील घेतले. पण आरोपी पुन्हा पीडिताशी प्रेमसंबंध जुळवण्यासाठी तिला त्रास देत होता. पीडित महिला कामावर ये-जा करताना आरोपीचा तिचा पाठलाग करत होता.

Ajit Pawar | ‘आजचे पालकमंत्री, उद्याचे मुख्यमंत्री’ अशी पुण्यात बॅनरबाजी

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आरोपीने बुधवारी सकाळी तिचे घर गाठले. आरोपीने पाठीमागून पीडिताच्या घरात प्रवेश केला. यानंतर सोबत आणलेल्या वायरीने तिचा गळा दाबला. यावेळी पीडितेने जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न केले. आरोपीला जोरात ढकलून तिने स्वत:ची सुटका केली. त्यानंतर शेजाऱ्यांच्या भितीने आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पीडित महिलेने आरोपीविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात फिर्यात देखील दिली. पीडितेचा जबाब नोंदवत पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here