रेल्वेभरती २०२३ | रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे जर तुमचे स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. कोकण रेल्वेमध्ये भरतीची प्रक्रिया नुकतीच सुरू झालेली आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने भरतीची अधिसूचना नुकतीच जारी केलेली आहे.
Nashik news | तरुणीने लग्नास नकार दिल्याने नाशकात वाहनांची केली जाळपोळ
या भरतीनुसार कोकण रेल्वेमध्ये ट्रेनी अप्रेंटिस पदाच्या 190 जागांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला konkanrailway.com भेट द्यावी तसेच या वेबाईटवर ऑनलाईन अर्ज भरावा. रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १० डिसेंबर २०२३ असणार आहे.
Big News | माधुरी दीक्षित यांना खासदारकीचं तिकीट? भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं केलं स्पष्ट
या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता कोणती?
कोकण रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान १८ वर्षे आणि कमाल वय हे २५ वर्ष असे निश्चित करण्यात आलेले आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण असावा. या शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवाराची निवड केली जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेसाठी बोलावण्यात येणार आहे. जे उमेदवार सर्व टप्पे पार करतील त्यांचा मेरिट लिस्टमध्ये समावेश केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम