देवळा : येथील किशोर सूर्यवंशी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मयत सभासद अशोक देवराम आहेर यांच्या वारस पत्नी श्रीमती भारती आहेर यांच्याकडे १२ लाख ५० हजार रुपयांचा विमा रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यातआला . देवळा येथील किशोर सूर्यवंशी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रत्येक कर्जदार सभासदांचा इफको टोकिया जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत विमा अपघाती विमा काढण्यात आला आहे .
कर्जदार सभासदाचे अपघाती निधन झाल्यास त्याचा कुटुंबातील सदस्यांना आर्थिक लाभ मिळतो . संस्थेचे जेष्ठ सभासद अशोक देवराम आहेर यांचे नुकतेच अपघाती निधन झाले असून संस्थेने आहेर यांच्या निधनानंतर इन्शुरन्स कंपनीकडे पाठपुरावा करून त्यांना १२ लाख ५० हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळून दिला आहे . या रकमेचा धनादेश वारसदार श्रीमती भारती आहेर ,मुलगा प्रतीक आहेर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला . यावेळी व्हा चेअरमन कौतिक पवार , संचालक प्रदीप आहेर ,योगेश वाघमारे ,व्यवस्थापक प्रशांत नाखरे ,सचिव भालचंद्र उगले आदी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम