द पॉईंट नाऊ ब्युरो : एक महत्वाची बातमी हाती येते आहे. AIMIM पक्षाचे धुळे शहरातील आमदार फारुख शहा यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.
आमदार फारुख शहा यांनी आपले अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यामुळे एका वेगळ्याच चर्चेला वाचा फुटली आहे.
शिवसेनेचे बंड केलेले आमदार आधी एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरतला जाऊन थांबले होते. मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी आमदारांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप केला होता. तर नुकतेच शिंदे यांच्या गोटातून परत आलेल्या आमदार देशमुख यांनी देखील आपल्याला बळजबरीने भलतेच कारण सांगून नेल्याची व्यथा मांडली होती. आता त्यात AIMIM पक्षाचे आमदार फारुख शहा यांनी देखील त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची तक्रार केल्याने, वेगळेच सूत जुळत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
शेवटी आमदारांच्या संख्येवरच सरकार स्थापन होत असते. त्यामुळे सध्याच्या घडीला आमदारांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यात बरेच अपक्ष आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात आहेत. त्यामुळे आमदार फारुख शेख यांच्या या तक्रारीने सर्वांचे डोळे विस्फारले गेले आहेत. आमदार फारुख शेख यांनी प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम