
देवळा : खुंटेवडी ता देवळा येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून श्रद्धा फौंडेशन व ग्रामपंचायतीच्या वतीने आजी माजी सैनिकांना सन्मान पत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

यानिमित्ताने “माझी माती माझा देश ” या उपक्रमांतर्गत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वीर हुतात्म्यांच्या सन्मानार्थ सीला फलकाचे अनावर , पंच प्रण शपथ, वसुधा वंदन, वीरांना वंदन व ध्वज वंदन आदी विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच व बाजार समिती संचालक भाऊसाहेब पगार यांच्या हस्ते आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास सरपंच ठगुबाई, उपसरपंच राजीव पगार माजी सरपंच आशाबाई माळी , बचत गटाच्या समुपदेशक वैशाली कुलकर्णी त्रम्बक बावा ,बाळू पवार, भिलाज भामरे,विनोद पगार ,राजेंद्र रौदळ, संजय भामरे,ग्रामसेविका पूनम सोनजे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे सभापती, उपसभापती ,संचालक मंडळ ,अंगणवाडी सेविका ,मदतनीस, मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राचार्य बी के रौदळ यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम