देवळा ; खर्डे ता देवळा येथील सेवानिवृत्त सैनिक दत्तात्रेय पवार आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले . देश सेवा बजावून माय भूमीत परतलेल्या भूमीपुत्राची खर्डे गावांत मिरवणूक काढण्यात येऊन जंगी स्वागत करण्यात आले.
खर्डे ता देवळा येथील दत्तात्रेय पवार सैन्य दलात भरती झाल्यानंतर त्यांनी आर्मी डिफेंस मधुन देवळाली कॅम्प , जम्मु – काश्मिर , पुणे , राजस्थान , दिल्ली , पंजाब , हिमाचल, प . बंगाल , जबलपुर , अहमदनगर , लेह – लडाख , गोवा , नागापुर ( पुलगाव ) केरळ येथे सेवा केली. आपल्या २८ वर्ष प्रदिर्घ सेवेनंतर (दि .२ ) रोजी त्यांचे गावात आगमन झाले.
सैन्य दलातून सेवानिवृत्त होऊन आपल्या मूळ गावी परत आलेल्या पवार यांचे मित्रपरिवार व नातेवाईकांनी मिरवणूकीद्वारे जल्लोषात स्वागत करून महिलांनी औक्षण केले . या कार्यक्रमास आजी माजी सैनिक ,सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे पदाधिकारी ,संचालक आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम