देवळा : खालप ता देवळा येथील सरपंचाच्या विरोधात आज सोमवारी दि १७ रोजी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला . गेल्या सोमवारी दि १० रोजी खालप ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्यांनी सरपंच मनीषा सूर्यवंशी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता .या संदर्भात आज सोमवारी दि १७ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांची बैठक घेण्यात आली.
बैठकीत सरपंच मनीषा वसंत सूर्यवंशी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव दोन विरुद्ध नऊ मतांनी संमत करण्यात आला .यावेळी ग्रामपंचायत सदस्य विमलबाई सूर्यवंशी , विजया देवरे, बेबीबाई सूर्यवंशी, कांताबाई पिंपळसे, हिरामण पवार ,संतोष डांबरे, मुरलीधर आहिरे ,सुनील सूर्यवंशी, बाजीराव सूर्यवंशी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम