
देवळा : खालप ता.देवळा येथील युवा शेतकरी व उद्योजक कैलास आनंदा देवरे यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. आज शुक्रवार (दि.१) रोजी कृषीदिनानिमित्त नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम झाला.

आदर्श शेतकरी व उद्योजक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे व कृषी विभागातील अधिकारी अधीक्षक सुनील वानखेडे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक विवेक सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कैलास देवरे यांचा कृषी पूरक सेंद्रिय गूळ उत्पादक व्यवसाय असून अल्पावधीत या व्यवसायात त्यांनी यात चांगली प्रगती केली आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या गुळाला जिल्ह्याबाहेर मागणी असते. शेतीतही प्रयोगशीलता व इतर युवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन यामुळे यापूर्वीही त्यांना कृषी विभागाचे पुरस्कार मिळाले आहेत. आज कृषीदिनानिमित्त त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्या वतीने श्री.देवरे यांना सन्मानित करण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम