Pandharpur | येत्या कार्तिकी एकादशीच्या महापुजेला राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाला बोलवायचे असा मोठा प्रश्न मंदिर समितीसमोर उभा असताना, अशातच ही कार्तिकी एकादशीची महापुजा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व त्यांच्या पत्नीच्या हस्ते व्हावी. अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आलेली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी अशी मागणी केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, कार्तिकी एकादशीची विठ्ठल राखुमाईची शासकीय महापूजा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. पण, यावेळी दोन उपमुख्यमंत्री असल्याने महापूजेला कोणाला निमंत्रण द्यावे असा पेच मंदिर समितीपुढे आहे. सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध करत, जर ही पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली तर, काळे फसू असा इशारा दिला आहे.
Nashik news | मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण
हा महापूजेचा पेच सोडविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ही महापूजा करावी अशी मागणी होत आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी अशी जोरदार मागणी केली आहे. यावर आता मंदिर प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्यात दोन दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकी महापुजेला कोण येणार याबद्दल आता चर्चा रंगल्या आहेत. यामध्ये अजित पवार यांचे नाव आघाडीवर होते. यंदाच्या कार्तिकी महापुजेला उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असे बोलले जात होते. मात्र, याबाबतीत मंदिर प्रशासनाने अद्याप कुठलाही खुलासा केलेला नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम