kalyan | कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांनी त्यांच्या भावाला जीवनदान दिले असून, त्यांच्या ह्या बंधुप्रेमाची संगळीकडून कौतुक होत आहे. माधुरी काळे यांचे भाऊ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस खात्यात कार्यरत आहेत.
दरम्यान, माधुरी काळे यांच्या भावाचे लिव्हर हे खराब झाल्यामुळे भाऊ हा अनेक शारीरीक यातना सहन करत होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यास सांगितले. पण त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी कुठेहि लिव्हर मिळत नव्हते. त्यावेळी भावाच्या मदतीला त्याची बहिणाबाई ही धावून आली व तिने तिचे लिव्हर हे आपल्या भाऊरायाला देण्याचा निर्णय घेतला.
लिव्हर हा मानवी शरीरातील भाग अर्धा काढला तरी, त्याची पुन्हा वाढ होत असते. त्यामुळे जवळपास ६० ते ६५ टक्के इतके लिव्हर आपण दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो. आपल्या शरीराचा महत्त्वाचा तुकडा हा भावाला दान देऊन ह्या बहिणीने आपल्या भावाला जीवनदान दिले आहे. दरम्यान, माधुरी काळे यांनी आपल्या भावाला ६५ टक्के लिव्हर दान केले असून, एका आजारी व्यक्तीचे पूर्ण लिव्हर काढून तिथे दुसऱ्या व्यक्तीच्या लिव्हरचा भाग बसवणे ही अतिशय कठिण अशी शस्रक्रिया असून, ती आज या भू बहीणीवर पार पडली आहे.
देवळा | विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम आत्मसात करणे गरजेचे; चंद्रकांत शहासने यांचं आवाहन
बहिणीच्या धाडसाचे कौतुक
जी व्यक्ती लिव्हर दान करणार असते, तिलाही अनेक चाचण्या कराव्या लागतात. आपल्या शरीराचा तुकडा काढून देणं हे सोपं नाही, तरीही माधुरी काळे यांनी कुठलाही विचार न करता आपल्या भावाचा विचार केला आणि त्याला जीवनदान दिले. त्यामुळे त्यांनी केलेल्या धाडसाचे सर्वच स्तरावरून मोठे कौतुक होत आहे.
माधुरी काळे यांच्या भावाचे लिव्हर हे काही कारणांमुळे पूर्ण खराब झालेले होते. त्यासाठी त्यांना तातडीने दुसऱ्या लिव्हरची गरज होती. त्यावेळी त्यांच्या बहिणीने त्यांचे लिव्हर देण्याची तयारी दाखवली. तसेच ही अवघड शस्रक्रिया यशस्वी देखील झाली. त्यामुळे ह्या बहिणीच्या बंधुप्रेमाने समाजासामोर एक अनोखं उदाहरण घालून दिलं आहे.
Crime news | रुग्णालयाच्या बाथरूम मध्ये सापडली मृत नवजात बालिका
दरम्यान, माधुरी काळे ह्या शिक्षिका असून, मागील १५ वर्षांपेक्षा जास्त दिवसांपासून त्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाच्या विजयनगर–आमराई ह्या भागातील वेगवेगळ्या प्रभागांमधून सातत्याने नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी नागरिकांसाठी अनेक कामं केले. त्यांचे कं हे अत्यंत नियोजनबध्द असते त्यामुळे कल्याणमध्ये त्या लोकप्रिय आहेत. दरम्यान, सध्या ह्या अनोख्या बंधुप्रेमाची सर्वच स्तरावरून कौतुक केले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम