Kajwa Mahotsav | काजवा महोत्सवाची पार पडली सांगता; काजवा महोत्सवामुळे आदिवासींच्या अर्थचक्राला चालना

0
20
Kajwa Mahotsav
Kajwa Mahotsav

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद |  “आपला माणूस आपल्यासाठी ही भूमिका घेऊन मी २००९ ते २०१४ साली शिर्डी मतदारसंघात आपल्या सेवेसाठी आलो. पुन्हा एकदा ती संधी तुम्ही सर्वांनी मला उपलब्ध करून दिली आहे.  म्हणून मी आपल्या सेवेसाठी कटिबद्ध राहील असा निर्वाणीचा शब्द मी या व्यासपीठावर पुन्हा एकदा देतो”, असे उद्गार लव्हाळवाडी येथील काजवा महोत्सवाच्या समारोप निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या व्यासपीठावर शिर्डी मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले.

लव्हाळवाडी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी काजवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या काजवा महोत्सवासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई भांगरे, युवा नेते अमित भांगरे, मधुकर तळपाडे, सतीश दादा भांगरे, शेंडीचे आदर्श सरपंच दिलीप भांगरे, लकी जाधव, महेश नवले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. भंडारदर्‍याच्या आदिवासी भागामध्ये काजवा महोत्सव ही संकल्पना स्वर्गीय अशोकराव भांगरे यांनी सुरू केली. तीच परंपरा त्यांचे सुपुत्र अमित भांगरे यांनी पुढे सुरू ठेवली आहे.(Kajwa Mahotsav)

Kajwa Mahotsav | बेरोजगारीच्या विश्वात काजवा महोत्सवात रानमेवा विकून आदिवासींचा उदरनिर्वाह 

आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी लव्हाळवाडी येथे आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक कलेचे आयोजन केले जाते. याही वर्षी लव्हाळवाडी येथील या काजवा महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी संघ सामील झाले होते या. आदिवासी बांधवांनी आपापल्या कला सादर करीत जमलेल्या प्रेक्षक रसिकांचे मने जिंकली. लव्हाळवाडी मध्ये आयोजित केल्या गेलेल्या काजवा महोत्सवासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनाही ग्रामस्थांच्या वतीने आमंत्रित केले गेले होते. लव्हाळवाडी येथे त्यांचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. युवा नेते अमित भांगरे यांनी आदिवासी भागामध्ये असलेल्या प्रश्नांना वाचा फोडत आदिवासी बांधवांचे प्रश्न भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासमोर मांडले.(Kajwa Mahotsav)

तर व्यासपीठावर वाकचौरे यांनी आदिवासी बांधवांच्या प्रश्नांना उत्तर देताना आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही दिली. आदिवासी बांधवांचा मानधनाचा प्रश्न, उडदावणे येथील ठका बाबांचे स्मारक, देवीचा घाट फोडण्याबाबतचा प्रश्न, आदिवासी भागात म्युझियम उभारण्यासाठी प्रयत्न, तोलार खिंड चा प्रश्न यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. ही सर्व कामे आपल्याला राज्याकडुन तसेच केंद्राकडुन कागदपत्रांचा पाठपुरावा करून करवुन घ्यावी लागतील व त्यासाठी मी कटिबद्ध राहील असे आश्वासन यावेळेस भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले. सदर कार्यक्रम हा लव्हाळवाडी येथील रावजी मधे, अर्जुन खोडके, कुशाबा पोकळे व सर्व ग्रामस्थांनी व्यवस्थित रित्या पार पाडला.(Kajwa Mahotsav)

Kajwa Mahotsav | हजारो काजवे लुकलूकले आणि डोळ्यांचे पारणे फिटले; काजवा महोत्सवाला पर्यटकांची गर्दी

Kajwa Mahotsav | यंदाच्या काजवा महोत्सवात हजारो पर्यटकांची हजेरी  

काजवा महोत्सव आदिवासींच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक पर्वणी ठरली दरवर्षीप्रमाणे या वर्षी काजवा महोत्सवात गेल्या पंधरा दिवसांत घाटगर अभयारण्यात हजारो पर्यटकांनी हजेरी लावली व काजवा महोत्सवातील निसर्ग सौंदर्याचा लाभ घेतला. या पंधरा दिवसांत शेंडी,मुरशेत,पांजरे लव्हाळवाडी सह परिसरातील सर्व गाव वाड्या वस्त्यातील आदिवासी बांधवांना रानमेवा विकून हक्काचा रोजगार उपलब्ध झाला.मुंबई पुणे नाशिक सह राज्यभरातून आलेल्या पर्यटकांकडून रांनमेव्याला पसंती देत कॅम्पिंग टेंट धारक हॉटेल व्यवसायिक छोटे मोठे स्टॉल धारक यांच्यासह स्थानिक आदिवासी बांधवांनी रानमेवा विकून लाखो रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल केल्याचे समजते.(Kajwa Mahotsav)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here