Jitendra Joshi : जितेंद्र जोशीचा ‘रावसाहेब’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0
22

Jitendra Joshi : अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जितेंद्र जोशीचा ‘रावसाहेब’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचा टीझर आलेला आहे.या सिनेमाचा टीझर जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. ‘गोदावरी’ चित्रपटानंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक निखील महाजन आणि ‘गोष्ट एका पैठणीची’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता अक्षय बर्दापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

‘रावसाहेब’ सिनेमाची तगडी स्टारकास्ट 
‘रावसाहेब’ या सिनेमात अभिनेत्री मु्क्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी अगडेकर आणि  अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एकंदरीतच टीझर आऊट झाल्याने तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे. प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जिजीविशा काळे यांनी या सिनेमाचं कथानक लिहिलं आहे.

Mumbai | मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला सफाई कामगारांच्या वसाहतींबाबत निर्णय

चित्रपटाच्या संवादांची वाढला उत्सुकता- 

देशाची सिस्टीम बिघडली की सिस्टीमचं जंगल होतं : जितेंद्र जोशी
या चित्रपटाच्या टिझरमध्ये दिसणारी तगडी स्टारकास्ट आणि टिझरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची ‘रावसाहेब’बद्दलची उत्कंठा ताणली गेली आहे.जितेंद्र जोशीने ‘रावसाहेब’चा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

टीझर शेअर करत अभिनेता जितेंद्र जोशीने लिहिलं आहे,

“देशाची सिस्टीम बिघडली की सिस्टीमचं जंगल होतं…’रावसाहेब’ जवळच्या चित्रपटगृहात”. जितेंद्रच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत आगामी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Dhule | आई-दादा माफ करा म्हणत संपवले प्रेमीयुगलांनी जीवन
रावसाहेब’ या सीरिजबद्दल बोलताना दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात,

“रावसाहेब’च्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबतच खिळवूनही ठेवेल. प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा ‘रावसाहेब’ला खऱ्या अर्थाने वेगळे करतो. ग्राउंडब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत. आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही”.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here