Jitendra Awhad | शालेय विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी या उद्देशाने शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश करण्यात येणार असून, यावरून आता राज्यात राजकारण सुरू आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला काल शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कडाडून विरोध केला आणि त्यांनी महाड येथे याविरोधात चवदार तळ्यावर आंदोलन केले आणि मनुस्मृतीचे दहन केले.
मात्र, हे आंदोलन आता आव्हाड यांच्या चांगलंच अंगलट आल्याचे दिसत आहे. कारण यावेळी आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. B. R. Ambedkar) फोटो फाडल्याचा दावा भाजपने (BJP) केला असून, यावरून आव्हाड यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलनंही केली जात आहे. मात्र, याप्रकरणी अता नवा ट्विस्ट आला असून, या प्रकरणी अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ..?
दरम्यान, यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,”जितेंद्र आव्हाड हे एका चांगल्या भावनेने महाड येथे गेले होते. मात्र, यावेळी त्यांनी चुकून फोटो फाडला. त्यांनी यासाठी माफीही मागितली आहे. मला वाटतं की आधी आपण त्यांची भावना लक्षात घ्यायला हवी. केवळ विरोधी पक्षातील असल्यामुळे त्यांच्यावर टीका करणे यात काही अर्थ नाही. आम्हाला शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मनुस्मृतीचा चंचूप्रवेश नको आहे. मार, आता या मुख्य मुद्द्यावरून लक्ष विचलीत होईल आणि फक्त जितेंद्र आव्हाडांवरच(Jitendra Awhad) लक्ष केंद्रीत होईल.
Jitendra Awhad | नेमकं प्रकरण काय ?
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश केला जाणार असून, या निर्णयाला शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. एवढेच नाहीतर तर, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यासाठी त्यांनी थेट महाडला चवदार तळ्यावर जाऊन आंदोलन केले. ते चवदार तळ्यावर जाऊन तळ्यातील पाणी प्यायले आणि त्यांनी तेथे मनुस्मृतीचे दहन देखील केले.
तसेच यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत असताना आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याचा दावाही भाजपने केला आहे. दरम्यान, या आरोपांनंतर आव्हाड (Jitendra Awhad) यांनी “माझ्याकडून हा सर्व प्रकार चुकून झाला”, असे म्हणत जाहीर माफी देखील मागितली. मात्र भाजपने हा मुद्दा चांगलाच उचलून धरत टिका आणि निषेध सुरूच ठेवला आहे.
Jitendra Awhad | राज्यात भाजप कार्यकर्ते आक्रमक; महाराष्ट्रातील वातावरण पेटलं!
माझे सर्वांना आवाहन…
माझी बहुजन समाजातील तसेच दलित, ओबीसी, मराठा, ब्राह्मण, महिला आणि मनुस्मृतीला विरोध करणारे जे काही आहेत त्या सर्वांनी मनुस्मृतीचा शालेय शिक्षणात चंचूप्रवेश नको या मुख्य मुद्द्यावर लक्ष द्यायला हवं. नाहीतर आपले लक्ष आता भलत्याच दुसऱ्या ठिकाणी केंद्रीत होईल, असे आवाहन भुजबळांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम